Home /News /entertainment /

'घराणेशाही फक्त बॉलिवूडच नाही तर मराठी इंडस्ट्रीतही' दिग्दर्शकाचा धक्कादायक खुलासा

'घराणेशाही फक्त बॉलिवूडच नाही तर मराठी इंडस्ट्रीतही' दिग्दर्शकाचा धक्कादायक खुलासा

बॉलिवूडनंतर आता मराठी इंडस्ट्रीमध्येही अशीच घराणेशाही अस्तित्वात असल्याचा धक्कादायक खुलासा झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

    मुंबई, 17 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. वयच्या 34 व्या वर्षी सुशांतनं मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर त्यावर अनेकांनी ट्वीट केले, हळहळ व्यक्त केली. पण कंगना रणौतनं एक व्हिडीओ शेअर करत पुन्हा एकदा या सर्वाला बॉलिवूड मधील घराणेशाही जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. त्यावरुन आता बॉलिवूडमध्ये नेपोटिझम वाद सुरू झाला आहे. ज्यात अनेकांनी सलमान खान, YRF बॅनर आणि करण जोहर यांना ट्रोल करायला सुरुवात केली. त्यानंतर आता मराठी इंडस्ट्रीमध्येही अशीच घराणेशाही अस्तित्वात असल्याचा धक्कादायक खुलासा झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मराठी इंडस्ट्रीतही घराणेशाही आहे, मक्तेदारी चालते. पडद्यामागून ही सूत्रं हलवली जातात, असा धक्कादायक खुलासा मराठी सिनेसृष्टीतले दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी केला आहे. त्यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत यावर भाष्य केलं आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणाले, 'इंडस्ट्रीत कोणी नवीन आलं असेल, काही चांगलं काम करत असेल, कोणी पुढे जात असेल तर त्याचे पाय खेचण्याचं काम इथेही केलं जातं. एखाद्याची कला चांगली असेल, तो उत्तम अभिनेता असेल आणि अनेक वर्षे काम करत असेल तरी त्याला संपवण्याचा घाट इथलीच काही मंडळी करत असतात. ही मंडळी स्वत:ला अतिशहाणे समजतात. समोरून हे वार करत नाहीत, तर पडद्यामागून ही सूत्र हलवली जातात.' अशी टीका त्यांनी केली आहे. महेश टिळेकर आपल्या व्हिडीओत पुढे सांगतात, 'मला अनेकांनी आव्हान दिलं होतं की तुला इंडस्ट्रीतून काढून टाकेन. मी माझ्या जिद्दीने टिकून आहे. ही लोकं मानसिक खच्चीकरण करतात. माझ्या चित्रपटांवरून अफवा उठवल्या गेल्या. मी असे अनेक राजकीय डाव हाणून पाडले आहेत. शेतकरी कुटुंबातून मी इथवर आलो. गॉडफादर नसतानाही पाय रोवून उभा आहे. 'मराठी तारका' या कार्यक्रमाचं कोणीच कधी कौतुक केलं नाही. चित्रपट प्रदर्शनापूर्वी ही लोकं अनाथाश्रमात जातात, खोटंखोटं रडतात आणि त्यांची प्रसिद्धी केली जाते. पण प्रामाणिकपणे काम केलेल्यांचं कौतुक केलं जात नाही.' 'बॉलिवूड असो किंवा मराठी इंडस्ट्री इथे फक्त 20 टक्के लोकं चांगली आहेत. बाकी सगळी ग्रुपमध्ये वावरणारी आहेत. नको त्या चित्रपटांना पुरस्कार दिले जातात, त्यांची वाहवा केली जाते. यांचे दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. नवीन आलेल्या कलाकारांना पाण्यात बघितलं जातं. जसं हिंदीत चालतं तसंच इथेही चालतं. मैत्रीचं वातावरण फक्त दाखवण्यापुरतं आहे' अशा शब्दात त्यांनी मराठी इंडस्ट्रीवर टीका केली आहे. सुशांतच्या निधनानंतर अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, 'माझ्याही मनात आत्महत्या...' दिग्दर्शक अभिनव कश्यपनं सलमान खानवर केले गंभीर आरोप, भाऊ अनुराग म्हणतो...
    Published by:Megha Jethe
    First published:

    पुढील बातम्या