‘कोरोना’रुग्णांना घेण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ला, 1 डॉक्टर आणि 3 पोलीस जखमी

‘कोरोना’रुग्णांना घेण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ला, 1 डॉक्टर आणि 3 पोलीस जखमी

डॉक्टरांचं एक पथक रुग्णाच्या कुटुंबीयांना क्वारंटाइन करण्यासाठी घेऊन जात होतं. त्यानंतर जमावाने त्यांच्यावर दगडफेक सुरू केली.

  • Share this:

लखनऊ 15 एप्रिल: कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टर्स आणि पोलीस आघाडीवर जाऊन लढत आहेत. मात्र या मंडळींना अनेकदा हल्ल्यांना सामोरं जावं लागत आहे. अशा अनेक घटना वारंवार पुढे येत आहेत. त्यामुळे डॉक्टर्स आणि पोलिसांच्या मनोधर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशीच एक उत्तर प्रदेशातली घटना समोर येत आहे. मुरादाबाद जिल्ह्यातल्या नागफनी भागात नवाबपूरा मस्जिद हाजी नेब या भागात संशयीत रुग्णांना घेण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ला झाला. या हल्ल्यात एक डॉक्टर आणि दोन पोलीस जखमी झालेत.

याच भागत  तबलिगी जमातमध्ये गेलेल्या एका व्यक्तिला कोरोना झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर डॉक्टरांचं एक पथक रुग्णाच्या कुटुंबीयांना क्वारंटाइन करण्यासाठी घेऊन जात होतं. मात्र त्याच वेळी परिसरातल्या लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि त्यांना घेऊन जाऊ नका असं सांगितलं. क्वारंटाईन केलेल्या लोकांना जेवण दिलं जात नाही असाही आरोप केला.

त्यानंतर पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता जमावाने त्यांच्यावर दगडफेक सुरू केली. त्यात एका डॉक्टरसह 3 पोलीस जखमी झालेत. यात काही गाड्यांचही मोठं नुकसान झालं. त्यानंतर घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले. हल्ले खोरांविरुद्ध रासुकाखाली कारवाई करण्यात येईल असा इशारा उत्तर प्रदेश सरकारने दिला आहे.

प्रशासनाचा आदेशानंतर हिंदू-मुस्लीम रुग्णांसाठी कोविड-19 चे वेगवेगळे वॉर्ड

अमेरिका, इटली, स्पेन, फ्रान्सनंतर आता भारतातही कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढायला सुरुवात झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 24 तासांत 1 हजार 36 नवीन रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 11 हजार 439वर पोहोचली आहे. त्यापैकी 9 हजार 756 रुग्णांवर देशातील विविध राज्यांमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लॉकडाऊनमध्ये धारदार शस्त्रानं वार, पाहा तरुणाच्या हत्येचा थरारक VIDEO

दिलासादायक बाब म्हणजे 1 हजार 306 रुग्णांनी कोरोना विरुद्ध यशस्वी लढा दिला असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांना पुढचे 14 दिवस होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत 377 लोकांचा मृत्यू झाला असून त्यातील 178 रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.

First published: April 15, 2020, 4:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading