मुंबई, 04 फेब्रुवारी: इंग्रजी विषय हा तसा कठीण बोलायला तर अडखळतंच हो पण पेपर लिहायच्या वेळीही जेमतेम पास होण्याइतका पेपर लिहून आपण बाहेर पडतो. थोडं लक्ष दिलं तर आपल्यालाही चांगलं जमू शकतं हा विश्वास आधी स्वत:वर ठेवायला हवा. दहावी-बारावीच्या परीक्षा अगदी तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. आणि त्यातही पहिले दोन पेपर भाषेचे असल्यानं त्यातच इंग्रजी विषय येतो. या विषयात मार्क कमी मिळाले की टक्केवारी घसरते. अशावेळी इंग्रजीची भीती दूर करण्यासाठी आणि चांगले गुण मिळवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला छोट्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्सचा आधार घेऊन तुम्ही इंग्रजी विषयात चांगले मार्क मिळवू शकता.
1.उतारा आणि कविता वाचून जे प्रश्न सोडवायचे असतात यामध्ये तुमचं वाचन कौशल्य विकसित करणं गरजेचं आहे. त्यासाठी जास्तीत जास्त उतारे डोळ्याखालून जाणं गरजेचं आहे. या प्रश्नांना सर्वात जास्त वेळ जातो त्यामुळे प्रत्येक उतारा किंवा कवितेचे प्रश्न किती मिनिटांत सोडवायचे ते ठरवून घ्या. ती वेळ झाली की पुढच्या प्रश्नाकडे जा.
2. प्रश्न पत्रिकेचं स्वरूप आणि एकूण प्रश्नासाठी असलेले गुण लक्षात घेऊन त्यानुसार प्रश्नाचं उत्तर लिहिताना वेटेज द्यावं.
3. व्याकरणाचा विषय मार्क मिळवून देणारा असतो. त्यामुळे त्याचा व्यवस्थित अभ्यास करा.
4. धड्याचं नाव, लेखकाचं नाव आणि त्यातील पात्र लक्षात ठेवा.
हेही वाचा-मुलाखतीला जाताना करू नका या चुका, लक्षात ठेवा 6 गोष्टी
5.आपल्या स्वतःच्या शब्दात सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. व्याकरणाची काळजी घ्या आणि शब्दलेखन तपासा
6.मॉक टेस्ट किंवा मागील वर्षाचे पेपर शक्य तितके सोडवा.
7. कवितेच्या आणि उतारातल्या ओळी उत्तर म्हणून जशाच्या तशा लिहू नका त्याचा परिणाम गुणांवर होतो.
8. येत नसेल तर प्रश्न तात्पुरता सोडून पुढे जा. पुढचे प्रश्न सोडवा. शेवटच्या 30 मिनिटांत संपूर्ण पेपर तपासून पाहा. जो भाग राहिला आहे तो लिहा. अवघड न येणारे प्रश्न सोडवण्यात जास्त वेळ गेला तर उत्तरपत्रिका अर्धवट राहाते.
9. उत्तर पत्रिका स्वच्छ ठेवा. खाडाखोड अथवा ओव्हरराईट सारख्या चुका टाळा. सुटसुटीत शुद्ध आणि चांगलं लिहिण्यावर भर द्या.
10. आत्मविश्वास ठेवा. योग्य विश्रांती घ्या. आणि सोप्या शब्दात पण आपल्या भाषेत उत्तर पत्रिकेत लिहा.
हेही वाचा-बँकेत नोकरीची संधी, 31 ते 51 हजार रुपये मिळणार पगार
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.