Home /News /career /

मुलाखतीला जाताना करू नका या चुका, लक्षात ठेवा 6 गोष्टी

मुलाखतीला जाताना करू नका या चुका, लक्षात ठेवा 6 गोष्टी

एखाद्या नोकरीच्या इंटरव्ह्यूला जाऊन ती गमावणं आजच्या दिवसांत तरी परवडण्यासारखं नाही. पूर्वी जशा पटकन नोकऱ्या मिळायच्या तशी परिस्थिती आता नाही.

    मुंबई, 03 फेब्रुवारी: आधीच नोकरी मिळत नाही आणि संधी आली तर मुलाखतीच्या वेळी आपण धांद्रटपणा करून ती संधी गमावून बसतो. बऱ्याचवेळी आपण लेखीमध्ये खूप चांगले मार्क मिळवतो मात्र मुलाखतीमध्ये एखाद्या मार्कानं सिलेक्शन हुकत. अशी वेळ पुन्हा येऊ नये आणि आलेल्या संधीचं सोन करण्यासाठी मुलाखतीला जाताना काय काळजी घ्यावी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. दिवस मंदीचे आहेत आणि एखाद्या नोकरीच्या इंटरव्ह्यूला जाऊन ती गमावणं आजच्या दिवसांत तरी परवडण्यासारखं नाही. पूर्वी जशा पटकन नोकऱ्या मिळायच्या तशी परिस्थिती आता नाही. स्पर्धेच्या जगात आपल्याला सिद्ध करण्यासाठी मुलाखतीला जाताना काही गोष्टी या कटाक्षानं पाळणं महत्त्वाचं आहे. 1. मुलाखतीमध्ये व्यक्तीमत्त्वाला महत्त्व दिलं जातं. तुमच्या पेहरावापासून वागण्या-बोलण्यापर्यंत बारिक निरीक्षण केलं जातं. आपला ड्रेस आपण जिथे मुलाखत देण्यास जात आहोत त्या प्रोफेशनसाठी साजेसा नीट-नेटका असावा. 2. आपल्या बोलण्यात विनंम्रता असायला हवी. कोणताही बडेजाव न करता योग्य पद्धतीनं खरी उत्तर द्यावीत. 3. ज्या गोष्टी तुमच्या बायोडाटामध्ये लिहिल्या आहेत त्य़ाच गोष्टी सांगण्यात वेळ वाया घालवू नये. त्यापेक्षा अशा गोष्टी सांगाव्यात ज्या माहीत नाहीत किंवा त्या बायोडाटामध्ये लिहिल्या नाहीत. हेही वाचा-सरकारी नोकरीची संधी, सार्वजनिक आरोग्य विभागात 177 पदांची भरती 4. संपूर्ण मुलाखतीमध्ये आपला हजरजबाबीपणा, रिअॅक्ट होण्याची वृत्ती, प्रत्येक परिस्थितीवर आपण कशापद्धतीनं मात करू शकतो या सगळ्याची गणित मुलाखत घेणारा व्यक्ती आपल्या मनात मांडत असतो. 5. सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच मुलाखत दिली पाहिजे. तुम्हाला स्वत:ला तुमच्या अचिव्हमेन्टस्‌ना दाखवायचं असतं. समोरच्या व्यक्तीला तुम्ही काय केलंय हे तेवढ्या 15 मिनिटांत सांगायचं असतं. तेव्हा त्या पंधरा मिनिटांच्या संधीचा आपण पुरेपूर फायदा उठवायला पाहिजे. संधीचं सोनं करा. 6. विषय सांगितल्यावर लगेचच जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला जास्त पॉईंट्स मिळतात.दुसरा कोणी बोलत असताना मधे बोलू नका.आपलं मत मांडताना सर्वांकडे बघून बोला.शांतचित्तानं एखाद्या व्यक्तीला दुजोरा द्या.जर तुम्हाला वाटलं की याशिवाय जास्त पॉइंट नाहीत तर त्या मुद्द्यावरील चर्चा संपवा. इंटरव्ह्यूमध्ये नेहमी विचारले जाणारे प्रश्न - तुम्हाला तुमचा सध्याचा जॉब का सोडायचा आहे?तुम्ही आमच्या जॉबसाठी कसे फिट आहात? तुम्हाला या वर्षी काय करायचंय? तुम्हाला आम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत काय? हेही वाचा-नोकरी शोधताना होऊ शकते फसवणूक, वापरा 'या' सोप्या 5 टिप्स
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Job, Jobs apply

    पुढील बातम्या