SBI बँकेत नोकरीची संधी, 31 ते 51 हजार रुपये मिळणार पगार

SBI बँकेत नोकरीची संधी, 31 ते 51 हजार रुपये मिळणार पगार

नोकरीसाठी अजून अर्ज केला नसेल तर आजच करा, 'ही' आहे अर्ज करण्याची अंतिम मुदत

  • Share this:

मुंबई, 04 फेब्रुवारी: (SBI) स्टेट बँक ऑफ इंडियाने HR स्पेशलिस्टसह एकूण 22 पदांसाठी पुन्हा एकदा भरती सुरू केली आहे. यामध्ये उपव्यवस्थापक पदांचाही समावेश आहे. या सर्व नेमणुका कायमस्वरूपासाठी केल्या जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2020 आहे. पदे पात्रता आणि अटी काय आहेत जाणून घ्या.

1.HR स्पेशलिस्ट (भारती)रिक्त पद- 01 (अनारक्षित)

पात्रता- मान्यताप्राप्त संस्थेतून MBA, PGDM केलेलं असावं. तसेच अर्जदाराला 7 वर्षांचा किमान अनुभव असावा. अर्जदाराचे जास्तीत जास्त वय 35 वर्ष असावे.

पगार दर महिना- 42,020 ते 51,490 रुपये

2.व्यवस्थापक (डेटा सायंटिस्ट)रिक्त पदे- 10

पात्रता- मान्यताप्राप्त संस्थेतून बी. टेक / एम. टेक पदवी संगणक विज्ञान / आयटी / डेटा सायन्स पैकी कोणतीही पदवी घेतलेली असावी. त्याला संगणकाचे आणि मशीनचं ज्ञान असावं. कमीत कमी 60 टक्के गुण मिळवलेले असावे. तसेच अर्जदाराला 5 वर्षांचा किमान अनुभव असावा. अर्जदाराचे वय किमान 26 ते जास्तीत जास्त 35 वर्ष असावे.

पगार दर महिना- 42,020 ते 51,490 रुपये.

हेही वाचा-vacancy: ठाणे महानगरपालिकेसाठी 'ही' आहे अर्ज करण्याची अंतिम मुदत

3.उप व्यवस्थापक (डेटा सायंटिस्ट) रिक्त पदे- 10

पात्रता- फायनांन्स विषयात MBA किंवा PGDA केलेलं असावं. मशीन लर्निंग अॅण्ड एआईचं प्रमाणपत्र त्याच्याकडे असावं. कामाचा 3 वर्ष अनुभव असावा. अर्जदाराचे वय किमान 24 आणि कमाल 32 वर्षे असावे.

दर महिना पगार- 31705 ते 45950 रुपये.

4. उपव्यवस्थापक (सिस्टम अधिकारी) रिक्त पदं 05

पात्रताः बी. टेक / एम. टेक पदवी संगणक विज्ञान / आयटी / डेटा सायन्स / मशीन लर्निंग आणि एआय मध्ये किमान 60% गुणांसह.

याव्यतिरिक्त, संबंधित क्षेत्रात किमान तीन वर्ष काम करण्याचा अनुभव असावा.

वय मर्यादा: किमान 24 आणि कमाल 32 वर्षे.

वेतनश्रेणी: 31705 ते 45950 रुपये.

हेही वाचा-मुलाखतीला जाताना करू नका या चुका, लक्षात ठेवा 6 गोष्टी

कशी असेल निवड प्रक्रिया

ऑनलाईन अर्जामधून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. शिक्षण आणि कामाच्या अनुभवावरून उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे. अर्जदाराला साधारण अर्जासोबत 750 रुपयांचे शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भरावं लागणार आहे.

कसा भरायचा अर्ज

सगळ्यात पहिल्यांदा www.sbi.co.in या बँकेच्या संकेतस्थळाला भेट द्या. तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यानंतर लिंक टू अप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करा. त्यानंतर तुमची माहिती, तुमचा रिझ्युम, फोटो आणि सही अपलोड करा. त्यानंतर तुम्हाला अर्जाचे शुल्क भरावं लागणार आहे. ते ऑनलाईन स्वरुपात डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगनेच भरता येते. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक PDF येईल ती पीडीएफ डाऊनलोड करून घ्या. अर्जभरण्याची अंतिम मुदत 12 फेब्रुवारी 2020 आहे.

हेही वाचा-सरकारी नोकरीची संधी, सार्वजनिक आरोग्य विभागात 177 पदांची भरती

First published: February 4, 2020, 9:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading