नवी दिल्ली, 02 फेब्रुवारी: अनेकांना ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) किंवा RC नसल्याने ट्रॅफिक पोलिसांनी चालान कापल्याच्या घटना घडल्या आहेत. गाडी चालवताना वाहतुकीचे नियम (Traffic Rules) पाळणं गरजेचं असतं. यात चालकाने आवश्यक ती कागदपत्र जवळ बाळगणं महत्त्वाचं असतं. कागदपत्र तुमच्याकडे नसल्यास पोलिसांकडून चालान कापून (Challan) दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे वाहनाची कागदपत्र स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करणं फायद्याचं ठरतं. यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स, RC ची हार्ड कॉपी सोबत ठेवली नाही, तरी चालान कापलं जाणार नाही. वाहनाची कागदपत्र सुरक्षित ठेवण्यासाठी, तसंच जवळ हार्ड कॉपी बाळगायची नसल्यास सरकारच्या डिजीलॉकर (DigiLocker) किंवा mParivahan App ती मदत घेता येते. DigiLocker किंवा mParivahan App मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स ठेवल्याने याची हार्ड कॉपी हरवण्याचा धोका नसतो. ट्रॅफिक पोलिसांना स्मार्टफोनमधील या App द्वारे ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाडीचे इतर कागदपत्र दाखवता येतात. mParivahan App अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीसाठी उपलब्ध आहे. App डाउनलोड झाल्यानंतर यात अकाउंट तयार करावं लागेल. यासाठी साइनअप करावं लागेल. साइनअप करताना मोबाइल नंबरची गरज लागेल. मोबाइल नंबर टाकल्यानंतर फोनवर OTP येईल. OTP टाकल्यानंतर अकाउंट वेरिफाय होऊन App मध्ये लॉगइन होईल.
हे वाचा - मुंबईतील तरुणीसोबत घडला विचित्र प्रकार;WhatsApp वापरत असाल तर आधी हा VIDEO पाहाच
लॉगइन झाल्यानंतर वर्चुअल ड्रायव्हिंग लायसन्स आणि RC and Documents चा ऑप्शन मिळेल. तो डाउनलोड करता येईल. RC and Documents मध्येच पोल्युशन आणि इन्शोरन्सचे डिटेल्स असतात.
हे वाचा - Budget expectations:बाइक किंवा स्कूटर खरेदीचा विचार आहे?स्वस्त होऊ शकतात वाहन दर
ही प्रक्रिया DigiLocker वरही आहे. तुम्ही DigiLocker वर अकाउंट बनवून वर्चुअल ड्रायव्हिंग लायसन्स फोनमध्ये डाउनलोड करून ठेवू शकता.

)







