नगरमधली भीषण घटना, पोलीस कर्मचाऱ्याला धडक देऊन कंटेनर उलटला

नगरमधली भीषण घटना, पोलीस कर्मचाऱ्याला धडक देऊन कंटेनर उलटला

अहमदनगर - औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास चौकात पहाटे ही घटना घडली आहे.

  • Share this:

अहमदनगर, 23 एप्रिल : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्याचे पोलीस जीवाची बाजी लावून आपलं कर्तृव्य बजावत आहे. परंतु, अहमदनगरमध्ये एका भरधाव कंटेनरने नाकाबंदीवर पोलीस कर्मचाऱ्याला उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अहमदनगर - औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास चौकात पहाटे ही घटना घडली आहे.  नाकाबंदी असल्यामुळे सर्वच वाहनांची तपासणी करूनच पुढे जाण्यास परवानगी दिली जात असते. परंतु, शहरातील शेंडी बायपास चौकात पहाटे एका भरधाव कंटेनरने नाकाबंदीवर न थांबता तसेच पुढे जाण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा  - कोरोनामुळे जेलमधून सुटले तोच ठरला शेवटचा दिवस, गावात येताच दोन्ही भावांचा मर्डर

यावेळी वाहतूक कर्मचारी नदीम शेख यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता कंटेनर चालकाने त्यांना जोरात धडक देऊन पुढे पळ काढण्याता प्रयत्न केला. परंतु, काही अंतर दूर गेल्यावर हा कंटेनरही उलटला.

हेही वाचा  -मुंब्य्रामध्ये दोन मजली इमारतीमध्ये अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारा VIDEO

नदीम शेख यांना उडवून कंटेनरचालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. कंटेनरचा वेग इतका होता की, त्यावर चालकाला नियंत्रण मिळवता आले नाही. रस्त्यावर असलेल्या दुभाजकाला आदळून हा भलामोठा कंटेनर रस्त्यावर उलटला. कंटेनर उलटल्यामुळे परिसरात एकच मोठा आवाज झाला. पोलिसांनी धाव घेऊन जखमी नदीम शेख यांना तातडीने रुग्णालयात हलवलं.  शेख यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. 

दरम्यान,   कंटेनर पलटी झाल्यानंतर चालकाने पळण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: April 23, 2020, 10:30 AM IST
Tags: Ahmednagar

ताज्या बातम्या