Home /News /mumbai /

मुंब्य्रामध्ये दोन मजली इमारतीमध्ये अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारा VIDEO

मुंब्य्रामध्ये दोन मजली इमारतीमध्ये अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारा VIDEO

या आगीमुळे युनिटमधील लाखों रुपयांचं सामान जळून खाक झालं आहे.

    मुंब्रा, 23 एप्रिल : मुंब्र्यातील दोन मजली इमारतीमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोळ उठले होते. काही क्षणात ही आग भडकली आणि रौद्र रुप धारण केलं. 5 टेक्साटाइल डायनिंग युनिटमध्ये ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. आग लागल्यानंतर स्थानिकांनी गोंधळ सुरू केला. आत कोणी अडकलं का याचा अंदाज घेत होते. त्यांनी तातडीनं अग्निशमन दलाला फोन करून आगीची माहिती दिली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पहाटे 3 च्या सुमारास लागलेल्या टेक्साटाइल डायनिंग युनिटमधील आगीच कारण अद्याप समजू शकलं नाही. या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून कुलिंग करण्याचं काम सुरू आहे. दरम्यान ही आग कशामुळे लागली असावी याची चौकशी करण्यात येणार आहे. या आगीमुळे युनिटमधील लाखों रुपयांचं सामान जळून खाक झालं आहे. संपादन- क्रांती कानेटकर हे वाचा-भारताने लॉकडाऊन हटवण्याची घाई करू नये, जागतिक तज्ञांचा सल्ला हे वाचा-पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या COVID19 टेस्टचा रिझल्ट झाला जाहीर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Thane

    पुढील बातम्या