• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • लोखंडी स्टॅण्डचे तीन घाव अन् खेळ खल्लास; 'ये शैतान मुझे तकलीफ दे रहा है' म्हणत रुग्णाची हत्या

लोखंडी स्टॅण्डचे तीन घाव अन् खेळ खल्लास; 'ये शैतान मुझे तकलीफ दे रहा है' म्हणत रुग्णाची हत्या

का रुग्णाने शेजारी झोपलेल्या एका बेघर रुग्णाची निर्घृण हत्या केली आहे. (File Photo)

का रुग्णाने शेजारी झोपलेल्या एका बेघर रुग्णाची निर्घृण हत्या केली आहे. (File Photo)

Murder in Solapur: सोलापूरातील शासकीय रुग्णालयातून हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका रुग्णाने शेजारी झोपलेल्या एका बेघर रुग्णाची निर्घृण हत्या (Patient Brutal murder in hospital) केली आहे.

 • Share this:
  सोलापूर, 15 सप्टेंबर: सोलापूरातील (Solapur) शासकीय रुग्णालयातून हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका रुग्णाने शेजारी झोपलेल्या एका बेघर रुग्णाची निर्घृण हत्या केली आहे. आरोपी रुग्णानं रुग्णालयातील सलाईन लावण्याचा लोखंडी स्टॅण्ड बेघर रुग्णाच्या डोक्यात घालून निर्दयीपणे हत्या (Brutal murder) केली आहे. या भयंकर हल्ल्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बेघर रुग्णाचा जागीच मृत्यू (homeless patient murder in hospital) झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. युसूफ मैलाली पिरजादे असं 34 वर्षीय आरोपीचं नाव असून तो मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. युसूफ पिरजादे याला छातीचा आजार असल्यानं तो सोलापूरातील शासकीय रुग्णालयात मागील 8 दिवसांपासून उपचार घेत होता. उपचार सुरू असताना शुक्रवारी हा रुग्ण रुग्णालयातून पळून गेला होता. पण नातेवाईकांनी त्याला शनिवारी रात्री पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. हेही वाचा-पावसामुळे शेती बरबाद, मराठा आरक्षण नसल्यानं मिळेना नोकरी;त्रस्त तरुणानं दिला जीव दरम्यान, सोमवारी रात्री आठच्या सुमारास संबंधित मनोरुग्णानं आपल्या शेजारील बेडवर झोपलेल्या बेघर रुग्णाची निर्घृण हत्या केली आहे. सोमवारी रात्री आठ वाजता आरोपी पिरजादे अचानक झोपेतून उठला आणि बेघर रुग्णाकडे हातवारे करत, 'ये शैतान है, मुझे तकलीफ दे रहा है...' असं म्हणत मोठ्यानं किंचाळू लागला. दरम्यान रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. हेही वाचा-पुण्यात अल्पवयीन मुलीचं धाडस; अत्याचारातून गरोदर राहिल्यानंतर गर्भपातास नकार पण वैद्यकीय कर्मचारी रुग्णाजवळ येईपर्यंत पिरजादे यानं जवळच असलेल्या सलाइन लावण्याच्या लोखंडी स्टॅण्डने बेघर रुग्णावर हल्ला केला. आरोपीनं बेघर रुग्णाच्या डोक्यात एकापाठोपाठ एक असे एकूण तीन घाव घातले. हा हल्ला इतका भयंकर होता की, संबंधित बेघर रुग्ण जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: