जालना, 15 सप्टेंबर: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा गंभीर बनत चालला आहे. मराठा समुदायाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा बांधवांनी राज्यभर मोठ्या संख्येनं आंदोलनं (Maratha Reservation Protest) केली होती. त्यानंतर मराठा समाजाला आरक्षणही जाहीर करण्यात आलं होतं. पण अलीकडेच सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) हे आरक्षण रद्दबातल ठरवलं आहे. त्यामुळे अनेक मराठा तरुणांच्या पदरी निराशा आली आहे.
अशातच जालना (Jalna) जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील आष्टी येथील येणोरा गावातील एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या (Young man suicide) केली आहे. गावी ओलादुष्काळ असल्यानं शेतीचं नुकसान झालं आणि मराठा आरक्षण नसल्याने नोकरी मिळत (Become jobless) नाही. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या हवालदिल तरुणानं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
हेही वाचा-बेरोजगारीनं झाले त्रस्त, मग बनावट नोटा छापून लाइफ केली मस्त; नाशकात 7 जण गजाआड
सदाशिव शिवाजी भुंबर असं आत्महत्या करणाऱ्या 22 वर्षीय तरुणाचं नाव असून तो परतूर तालुक्यातील आष्टी येथील येणोरा गावातील रहिवासी आहे. मृत सदाशिव हा मागील काही दिवसांपासून पुण्यातील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. त्यानं इलेक्ट्रीशनचा कोर्सही केला होता. मात्र मराठा समाजाला आरक्षण नसल्यानं त्याला नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी सदाशिव आपल्या गावाकडे येणोरा येथे आला होता.
हेही वाचा-NEET 2021 Leaked: NEET पेपर लीक झाल्याचं उघड; जयपूरमधून 8 जणांना अटक
त्याला घरी चार एकर शेती आहे. मात्र गावाकडेही सतत पाऊस असल्यानं त्याला ओला दुष्काळाचा सामना करावा लागला. पावसाच्या पाण्यामुळे शेतातील पिकंही करपून गेली होती. एकीकडे नोकरी सोडली आणि दुसरीकडे शेतीचं नुकसान झाल्यानं सदाशिव आर्थिक विवंचनेत सापडला होता. यामुळे हवालदिल झालेल्या सदाशिवनं आपल्या घरातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यानं आत्महत्येचा कारणांचा खुलासा केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maratha reservation, Suicide