मुंबई, 18 जून : लग्न म्हणजे मजा-मस्ती आली. लग्नाचे (Wedding video) असे बरेच विचित्र, मजेशीर व्हिडीओ व्हायरल (Viral video) होत असतात. पण सध्या सोशल मीडियावर (Social media) शॉकिंग व्हिडीओ व्हायरल होतो आहे. लग्नातच नवरी भलतेच चाळे करताना दिसली. तिचा हा प्रताप पाहून नवराही शॉक झाला. नवरीचं खरं रूप लग्नाच्या दिवशीच नवऱ्यासमोर आलं आणि मग नवरा भडकला.
लग्न हा प्रत्येक दाम्पत्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. त्यातही आपण ज्याच्यावर प्रेम करतो म्हणजे आपला बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेेंड आपली आयुष्याची जोडीदार होणार असेल तर हा आनंद अधिक द्विगुणित होतो. असंच एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारं कपल लग्नाच्या बंधनात अडकत होतं. तेव्हाच बॉयफ्रेंडसमोर गर्लफ्रेंडची पोलखोल (Girlfriend cheated boyfriend) झाली.
View this post on Instagram
व्हिडीओत पाहू शकता, नवरा-नवरी एकमेकांशेजारी बसले आहेत. नवरीच्या शेजारी त्यांचा मित्र बसला आहे, तर एक तरुणी उभी आहे. नवरा आणि नवरी खूप आनंदी दिसत आहे. नवरी आपल्या मॅरेज फॉर्मवर सही करते आहे. तेव्हा ती आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत बोलताना दिसत आहे. पण त्याचवेळी दुसरीकडे नवरीच्या शेजारी बसलेला तरुण मात्र टेन्शनमध्ये दिसतो आहे. अशा या आनंदाच्या क्षणी आता तो टेन्शनमध्ये का?
हे वाचा - वर्ल्ड रेकॉर्डच्या नादात गमावला जीव; 351 फूट उंच बाईक उडवताना भयंकर मृत्यू
व्हिडीओ नीट पाहिल्यानंतर तुम्हाला यामागील नेमकं कारण समजेल. नवरी भले एकिकडे आपल्या नवऱ्यासोबत हसते, बोलते आहे, मॅरेज फॉर्मवर सही करते आहे. तर दुसरीकडे टेबलच्या खाली पाहिलं तर तिचा एक पाय शेजारी बसलेल्या तरुणाच्या पायावर आहे. नवरीचं हे रूप पाहून तो तरुण तर गारच पडलेला दिसतो आहे. नवऱ्याला तो मागच्या बाजूने खुणावतो. नवरा वाकून पाहतो आणि मग काय त्याला जे दिसतं ते पाहून धक्काच बसतो.
हे वाचा - खांद्यावर हात ठेवला आणि...; नवऱ्याच्या मित्राने स्टेजवर केलं असं काही, नवरी शॉक
आपली गर्लफ्रेंड आणि होणाऱ्या बायकोचं खरं रूप समोर येताच त्याची सटकते. तो इतका भडकतो की गर्लफ्रेंडच्या हातातील मॅरेज फॉर्म घेतो आणि तो तिथंच फाडून टाकतो. त्यानंतर तिथून तो रागात निघून जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Couple, Relationship, Viral, Viral videos, Wedding, Wedding video