• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • वर्ल्ड रेकॉर्डच्या नादात गेला जीव; 351 फूट उंच हवेत बाईक उडवताना भयंकर मृत्यू

वर्ल्ड रेकॉर्डच्या नादात गेला जीव; 351 फूट उंच हवेत बाईक उडवताना भयंकर मृत्यू

हवेत उंच बाईक उडवण्याचा विश्वविक्रम करण्याच्या प्रयत्नात बाईक स्टंटमनचा भयंकर मृत्यू (Bike stuntman death) झाला आहे.

 • Share this:
  वॉशिंग्टन, 18 जून : आपली गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (World record) नोंद व्हावी, असं स्वप्नं कित्येकांचं असतं. यासाठी लोक काय काय नाही करत. काही जण तर अगदी आपल्या जीवाचाही विचार करत नाहीत. वर्ल्ड रेकॉर्ड करण्याच्या नादात अशाच एका बाईकरने (Biker death) आपला जीव गमावला आहे. हवेत उंच बाईक उडवण्याचा विश्वविक्रम करण्याच्या प्रयत्नात बाईक स्टंटमनचा भयंकर मृत्यू (Bike stuntman death) झाला आहे. अमेरिकेतील 28 वर्षांचा प्रसिद्ध बाइक स्टंटमन अॅलेक्स हारविलचा (Alex harvill) मृत्यू झाला आहे. वर्ल्ड रेकॉर्डसाठी 351 फूट उंच बाईक जंपसाठी तो प्रॅक्टिस करत होता. या सरावादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. वॉशिंग्टनमध्ये सुरू असलेेल्या मोसेस लेक एअरशोमध्ये होता. आपल्या जागतिक रेकॉर्ड जंपसाठी तो सराव करत होता. तिथले कित्येक लोक त्याचा व्हिडीओ बनवत होते. रिपोर्टनुसार, अॅलेक्सचं वॉर्म अप सुरू होतं आणि ही सकाळची त्याची पहिली जंप होती. हे वाचा - अरे बापरे! आजी व्हायची घाई; आईनेच लेकीला दिलं स्पर्म इंजेक्शन आणि... अॅलेक्स एका फिल्डमध्ये बाइक चालवत होता, त्यानंतर एका रॅम्पवर येऊन त्याने आपली बाईक हवेत उडवली. त्यानंतर ती जमिनीवर धाडकन कोसळली. रिपोर्टनुसार, तिथं उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी अॅलेक्सचं हेल्मेट हवेत उडताना पाहिलं. द ग्रँट काऊंटी कोर्नरनुसार,  एलेक्सला या अपघातातनंतर गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. वॉशिंग्टनमध्ये राहणाऱ्या अॅलेक्सने 2012 साली वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता. टोज मोटोक्रॉस पार्कमध्ये रँप टू डर्ट डिस्टन्स जंपमध्ये  425 फूट उंची गाठली होती. 2013 साली त्याने फूट डर्ट टू जम्प डर्टचा रेकॉर्ड कायम ठेवला होता. रिचलँडमध्ये झालेल्या स्पर्धेत त्याने 297 फूट उंची गाठली होती. हे वाचा - अजब जोडप्याचा गजब विश्व विक्रम; 123 दिवस हात बांधून राहिले सोबत, तरीही ब्रेकअप अॅलेक्सने या घटनेच्या एक महिनाआधीच आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं होतं. याबाबत सोशल मीडियावर पोस्टही केली होती. मी मोसे लेक वॉशिंग्टनमध्ये एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची तयारी करत आहे. मी या एअर शोमध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पुन्हा आपलं नाव नोंदवण्याचा प्रयत्न करेन, असं त्याने सांगितलं होतं. रँप टू रँपमध्ये रेकॉर्ड केल्यानंतर रँप टू डर्ट रेकॉर्डची तो तयारी करत होता. पण या दुर्घटनेमुळे त्याचं हे स्वप्नं अपुरं राहिलं.
  Published by:Priya Lad
  First published: