व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी स्टेजवर उभे आहे. सर्व नातेवाईक, मित्रपरिवार त्यांना येऊन शुभेच्छा देत आहे. नवऱ्याचे दोन मित्र तिथं येतात. त्यापैकी एक मित्र तर भडकलेलाच दिसतो आहे. तो थेट आपले दोन्ही हाता मित्राच्या खांद्यावर ठेवतो. काहीतरी रागात बोलतो. नवऱ्याला तो धमकी देत असतो. हे पाहून नवरीसुद्धा शॉक झाली आहे. ती घाबरलेली दिसते आहे. नेमकं काय होतं आहे ते तिलाच समजत नाही आहे. हे वाचा - भरमंडपात दीराने नवरीसमोर केलं असं काही, थांबवावी लागले फेरे; नेमकं काय घडलं पाहा यानंतर नवऱ्याचा मित्र एक हात नवऱ्याच्या खांद्यावर ठेवून दुसरा हात आपल्या पाठीमागे ठेवतो आणि तिथून तो एक फूल काढून नवऱ्याच्या हातात देतो. तेव्हा कुठे नवरीच्या जीवात जीव येतो. ती लाजेने खुदकन हसते. नवरा आणि त्याचे मित्रही हसू लागतात. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos, Wedding video