VIDEO : अति विषारी घोणसच्या 38 पिल्लांचा जन्मसोहळा !

घोणस आणि पिल्ले सर्पमित्र श्रीकांत गुजर यांच्या घरी सुरक्षित आहेत.

Sachin Salve | Updated On: Jun 28, 2018 10:31 PM IST

VIDEO : अति विषारी घोणसच्या 38 पिल्लांचा जन्मसोहळा !

अंबरनाथ,28 जून : अतिशय विषारी घोणस जातीच्या सर्पाने तब्बल ३८  पिल्लं दिल्याची घटना अंबरनाथला एएमपी गेट परिसरात घडली आहे. घोणस आणि पिल्ले सर्पमित्र श्रीकांत गुजर यांच्या घरी सुरक्षित आहेत.

सर्पमित्र श्रीकांत गुजर यांना परिसरात साप असल्याचा निरोप मिळाला. त्याठिकाणी ते गेले असता एक सर्प शांतपणे पडल्याचे त्यांना आढळून आले. त्याला उचलले तेव्हाच ती घोणस जातीची मादी असल्याचे आणि ती पिल्ले देणार असल्याचे तिच्या वजनावरून त्यांना समजलं. रात्रीच्या वेळी घोणसला एका मोठ्या प्लास्टिकच्या टबात ठेवण्यात आले,  गुजर यांचे साईबाबांचे मंदिर आहे. आज गुरुवारी सकाळीच मंदिर उघडण्यापूर्वी पाहिले असता घोणसने बादलीत ३८ पिल्लाना जन्म दिला होता.

घोणस आणि पिले दोघेही सुरक्षेत आहेत, या सगळ्यांना पुणे येथील कात्रजच्या सर्प उद्यान अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात  येणार असल्याचं गुजर म्हणाले.

गेल्या १४  वर्षांपासून  अंबरनाथासह विविध ठिकाणी बारा हजार साप पकडून त्यांना गुजर यांनी जीवदान मिळावे म्हणून जंगलात सुरक्षित स्थळी सोडून देण्यात आले आहे.

दरम्यान, घोणसची पिल्लं पहाण्यासाठी परिसरातील नागरिकांनी सर्पमित्र गुजर यांच्या घरी एकच गर्दी केली होती.

हेही वाचा

स्विस बँकेतल्या भारतीयांच्या पैशात झाली वाढ

VIDEO : विमान कोसळण्याचा थरार सीसीटीव्हीत कैद

कपिल पाटील यांची विजयाची हॅट्ट्रिक,भाजप-सेना पराभूत

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2018 10:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close