LPG Cylinder Price: गॅस सिलिंडरच्या किंमती 53 रुपयांनी झाल्या कमी, हे आहेत मुंबईचे दर

LPG Cylinder Price: गॅस सिलिंडरच्या किंमती 53 रुपयांनी झाल्या कमी, हे आहेत मुंबईचे दर

गेल्या महिन्यात विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत सुमारे दीडशे रुपयांनी वाढ झाली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 मार्च : होळी(Holi) आधी  सामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण एलपीजी (LPG Cylinder Price) सिलिंडरच्या किंमतीत तेल कंपन्यांनी मोठी कपात केली आहे. विना अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडर 1 मार्चपासून म्हणजेच आजपासून 53 रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्याचबरोबर 19 किलो वजनाचा विना अनुदानित सिलिंडरही 84.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आतापर्यंत 858.50 रुपयांना उपलब्ध होणारा सिलिंडर आता 805.50 रुपयात उपलब्ध होईल.

नवीन दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत सुमारे दीडशे रुपयांनी वाढ झाली होती. सर्व महानगरांमध्ये अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 144.50 रुपयांवरून 149 रुपयांवर आणली गेली, जी 12 फेब्रुवारीपासून लागू झाली होती.

चार महानगरांमध्ये विना अनुदानित गॅस सिलिंडरचे दर

इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत अनुदानाशिवाय 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 805.50 रुपये आहे. त्याचबरोबर विना अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत कोलकातामध्ये 839.50 रुपये, मुंबईत 776.50 आणि चेन्नईमध्ये 826 रुपये आहे.

हे वाचा - रचला इतिहास! महाराष्ट्राच्या डॉ. माधुरी कानिटकर लेफ्टनंट जनरल पदी

lpg

lpg

19 किलो सिलिंडरची किंमत

तेल कंपन्यांनीही 19 किलो विना अनुदानित सिलिंडरच्या किंमतीत 84.50 रुपयांची कपात केली आहे. या कपातीनंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 1381.50 रुपये करण्यात आली आहे. त्याचबरोबर, कोलकातामध्ये 1450 रुपये, मुंबईमध्ये 1331 रुपये आणि चेन्नईमध्ये 1501.50 रुपये द्यावे लागतील.

हे वाचा - विमान नाही, पक्षी नाही; हा तर फ्लाइंग जडेजा! कॅचचा अफलातून VIDEO

एलपीजी सिलिंडर किंमती कशा निश्चित केल्या जातात?

सरासरी आंतरराष्ट्रीय बेंचमार्क दर आणि विनिमय दरानुसार, एलपीजी सिलिंडरच्या किंमती निश्चित केल्या जातात. याच कारणास्तव, दरमहा एलपीजी सिलिंडरची अनुदानाची रक्कमही बदलते. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढतात तेव्हा सरकार अधिक अनुदान देते आणि दर खाली आल्यावर अनुदान कमी केले जाते. कराच्या नियमांनुसार, एलपीजीवरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) इंधनाच्या बाजारभावानुसार मोजला जातो.

अशी पाहा तुमच्या शहरातील एलपीजी सिलिंडरची किंमत

आयओसी वेबसाइटवर जा आणि https://indane.co.in/tarrifs_price.php वर क्लिक करा. तुम्हाला शो ऑल मार्केटचा टॅब दिसेल. त्यावर क्लिक करताच. त्याचप्रमाणे, एलपीजी सिलिंडरच्या किंमतींशी संबंधित यादी खाली दिली जाईल.

हे वाचा : 5 मार्चपर्यंत पडणार पाऊस; महाराष्ट्रात गारा, वादळी वाऱ्याचा तडाखा

First published: March 1, 2020, 11:27 AM IST

ताज्या बातम्या