सर्वोच्च न्यायालयाचा क्रांतिकारी निर्णय काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तळप्रमुखासारख्या नेतृत्वपदी महिलांच्या नियुक्तीची मार्ग मोकळा झाला होता. महिला लष्करी अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाचे स्वागत केले होते. लष्करामध्ये लिंगाधारित भेदभाव संपवण्यासाठी सरकारने आपल्या मानसिकतेत बदल करण्याची गरज सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली होती. डॉ. माधुरी कानिटकर यांच्याविषयी - कानिटकरांनी १९८० मध्ये एमबीबीएसमधून पदवी घेतली. त्यांचे शिक्षण पुण्यातील आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये झाले. तेथे असताना त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक मिळाले होते. त्यांनी पेडियाट्रिकमध्ये पदवीचे शिक्षण घेतले. अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रातून त्यांनी बालकांच्या मूत्रपिंड विकारांवरील उपचाराचे प्रशिक्षण घेतले. माधुरी कानिटकर या पुण्यातील लष्करी महाविद्यालयाच्या पहिल्या अधिष्ठाता होत्या. पुणे आणि दिल्लीत त्यांनी मूत्रपिंड विकारावर उपचारासाठी केंद्रे सुरू केली आहेत. कानिटकर यांचे पती राजीव कानिटकर लष्करात लेफ्टनंट जनरल होते. ते नुकतेच निवृत्त झाले आहेत. दाम्पत्याने लष्करात लेफ्टनंट जनरलपद स्वीकारल्याची ही पहिलीच घटना आहे.Delhi: Lieutenant General Madhuri Kanitkar today put on her ranks after her promotion. She is the third woman officer in the Indian armed forces to have become Lieutenant General. She has now been posted to Headquarters, Integrated Defence Staff under the Chief of Defence Staff. pic.twitter.com/JzcckVucmQ
— ANI (@ANI) February 29, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.