Home /News /news /

महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली गेली, बारामतीत पोलिसाची कॉलर पकडली

महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली गेली, बारामतीत पोलिसाची कॉलर पकडली

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

लॉकडाउनच्या काळात रस्त्यावर फळे विक्री करत गर्दी जमवलेल्या फळ विक्रेत्यांना शहर पोलिसांनी रोखले असता, फळविक्रेत्यांनी पोलिसांची कॉलर पकडून धक्काबुकी केल्याची घटना घडली आहे.

बारामती, 23 एप्रिल : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर आणि परिसरात संचारबंदी लागू केली असताना लॉकडाउनच्या काळात रस्त्यावर फळे विक्री करत गर्दी जमवलेल्या फळ विक्रेत्यांना शहर पोलिसांनी रोखले असता, फळविक्रेत्यांनी पोलिसांची कॉलर पकडून धक्काबुकी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती शहर परिसराच्या हद्दीत कुठलीही दुकाने सुरू राहणार नाहीत. त्यांची स्वयंसेवकांमार्फत होम डिलिव्हरी करण्यासंदर्भात आदेश आसताना, पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी शहरातील भिगवण चौक ते टी. सी. कॉलेज रस्त्यावरून जात असताना, ख्रिश्चन कॉलनीजवळ टेम्पोमधून टरबूजाची विक्री केली जात होती. हेही वाचा - 'मी देवाला सांगेन, सात जन्म असतील तर तूच हवी', पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या तसंच फळविक्रत्यामुळे लोकांची गर्दी जमा झाली होती. पोलीस येताच, खरेदीला आलेले नागरिक भितीने तेथून पसार झाले. फळविक्रेत्यांना नावे विचारली असता. काय करायचंय असं म्हटलं. पोलीस कर्मचारी नाळे यांनी गर्दी का जमवली, अशी विचारणा केली असता, त्याने पोलिसांशी अरेरावी आणि उर्मटपणा  सुरू केला.  'इथेच फळ विक्री करणार, माझी फळे मी कुठे विकणार' असं म्हणत त्याने पोलिसांच्या अंगावर धावून जात  कॉलर पकडून धक्काबुक्की सुरू केली. यावेळी तेथेच उपस्थित आसणारे पोलीस निरीक्षक औदुंबर  पाटील यांनी त्यांची सोडवणूक करत फळ विक्री बंद केली.  त्यानंतर तिघांनाही पोलीस स्टेशनला येण्यास सांगितले असता तेथून पळून जावू लागले. त्यावेळी त्याला थांबविताना पुन्हा पोलिसांशी त्याची झटापट झाली. हेही वाचा -एकत्र जीवन-मरणाची घेतली होती शपथ, प्रियकराने प्रेयसीला दिलं विष पण स्वत: मात्र.. पोलिसांनी या प्रकरणी  भाऊसाहेब रामदास मांडे (रा. मढेवडगाव, ता. श्रीगोंदा, जि. नगर), वैभव बाळासो मदने (रा. गवार फाटा, ता. बारामती) आणि राजू माणिक बागवान (रा. कचेरी रोड, बारामती) यांना ताब्यात घेऊन या तिघांविरोधात पोलिसांनी सरकारी कामात अडथळा, मारहाण, साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी पोपट नाळे यांनी फिर्याद दिली आहे.  शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील, पोलीस कर्मचारी नाळे यांच्यासह पोपट कोकाटे उपस्थित होते. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या