Home /News /crime /

एकत्र जीवन-मरणाची घेतली होती शपथ, प्रियकराने प्रेयसीला दिलं विष पण स्वत: मात्र....!

एकत्र जीवन-मरणाची घेतली होती शपथ, प्रियकराने प्रेयसीला दिलं विष पण स्वत: मात्र....!

आपण सोबत राहू शकत नाही असं म्हणत आत्महत्या करण्याचा निर्णय प्रेमी युगुलाने घेतला. पण यात फक्त एकाचाच मृत्यू झाला आहे.

    चंदीगड, 23 एप्रिल : आयुष्यात आपल्यावर प्रेम करणारा चांगला प्रियकर, जोडीदार असावा असं प्रत्येकाला वाटतं. हे प्रेम मिळवण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करावे लागतात. परंतू प्रत्येकालाच प्रेमात यश येतं असं नाही. यातून होणारे गुन्हे आणि आत्महत्या अशा अनेक घटना आपण पाहिल्या असतील. असाच एक मनाला हेलावून टाकणारा प्रकार समोर आला आहे. आपण सोबत राहू शकत नाही असं म्हणत आत्महत्या करण्याचा निर्णय प्रेमी युगुलाने घेतला. पण यात फक्त एकाचाच मृत्यू झाला आहे. पंजाबमधील माछीवाडा येथे ही बाब समोर आली आहे. माछीवाडा जवळ सैसनवाल खुर्द या गावात प्रेमी जोडप्याने कुटुंबातील सदस्यांनी लग्नाला न जुमानल्यास एकत्र आत्महत्या करण्याचं आश्वासन दिले होते. जगदीपसिंग या युवकाने सुखविंदर कौर (वय 20) हिला विष पिण्यासाठी दिले पण स्वत: मात्र विष प्यायलं नाही. विषामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप सुखविंदरच्या आईने केला आहे. ठाणेकरांसाठी घोक्याची घंटा, 100 पेक्षा जास्त आहेत करोनाबाधित क्षेत्र तर... काय आहे संपूर्ण प्रकरण मुलगा आणि मुलगी एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि त्यांना लग्न करायचं होतं. त्यांचे प्रेम पाहून कुटुंबियांना राग आला आणि त्यांनी लग्नासाठी नकार दिला. त्यानंतर प्रेमात अखंड बुडालेल्या जोडप्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. जगदीपने सुखविंदरला विष प्राशन करण्यासाठी दिले आणि स्वत: मात्र प्यायले नाही. मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे की जगदीपसिंग माझ्या मुलीशी लग्न करू इच्छित होता, पण आम्ही नकार दिल्यामुळे त्याने तिला कायमचं संपवलं. 21 एप्रिलला जगदीप त्याची आई सरबजितसह घरी आला आणि त्याने शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्याने सांगितले की, दुपारी सुखविंदर हिला उलट्या होऊ लागल्या होत्या. त्यानंतर जगदीपने संपूर्ण ड्रामा करत सुखविंदरला विषारी गोळ्या दिल्या आणि त्याने तिचा मृत्यू झाला. यानंतर त्यानेच तिला रुग्णालयात नेलं तेव्हा सुखविंदरला मृत घोषित करण्यात आलं. दिल्ली हादरली! बाल सुधारगृहात राडा, सुरक्षारक्षकावर हल्ला करून 11 अल्पवयीन फरार पोलिसांनी आई आणि मुलाविरूद्ध केला गुन्हा दाखल मुलीच्या आईच्या तक्रारीवरून जगदीपसिंग आणि सरबजित कौरविरोधात कलम 306 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केवळ दोन जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे, तर प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. कोरोनामुळे जेलमधून सुटले तोच ठरला शेवटचा दिवस, गावात येताच दोन्ही भावांचा मर्डर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Suicide news

    पुढील बातम्या