गडचिरोली, 23 एप्रिल : गडचिरोलीमध्ये राज्य राखीव दलाच्या जवानाने राहत्या घरात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
आजारपणाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं या जवाने आत्महत्येपूर्वी पत्रात स्पष्ट केलं आहे.
राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक 10 चे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शिदे यांनी मध्यराञी सावरगाव येथील पोलीस ठाण्याच्या क्वार्टरमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली. शिंदे यांच्या आत्महत्येमुळे राज्य राखीव दलात एकच खळबळ उडाली आहे.
शिंदे यांनी आपल्याकडे असलेल्या रायफलमधून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून जीवनयात्रा संपवली. शिंदे यांच्या मृतदेहाजवळ एक पत्र मिळाले त्यात आजारपणामुळे कंटाळून आत्महत्या केल्याचे पत्रात लिहिले आहे.
हेही वाचा - चीनमध्ये कोरोना Return; वुहाननंतर हार्बिनला धोका, सरकारकडून शहर सील
चंद्रकांत शिंदे यांनी हे पत्र आपल्या पत्नीला उद्देशून लिहिले आहे. या पत्रात त्यांनी अत्यंत भावनिक संदेश लिहिला आहे. आपली पत्नी मधू शिंदे यांची माफी मागत आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. चंद्रकांत शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात आपण गेल्या काही वर्षांपासून आजाराला कंटाळलो आहे. झोप काय असते हे मला माहितीच नाही. त्यातच कमरेचा त्रास होत आहे, त्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलं.
तसंच, तू माझ्या जिवनात आली त्यामुळे माझं आयुष्य सुकर झालं होतं. माझ्या दोन्ही मुलांना तू चांगलं सांभाळलं. तुझ्या नातेवाईकांनीही चांगली साथ दिली. तू सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे हाताळल्या आहे. त्यामुळे मला तुझ्यावर गर्व आहे. आजपर्यंत मी फक्त आनंदी राहण्याचा आणि दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला, असंही त्यांनी आपल्या या पत्रात म्हटलं आहे.
'मी फक्त जिवनाच्या आजाराला कंटाळून हे पाऊल उचलले आहे. कारण, मला झोपच माहिती नाही. हे जवळपास ५ ते ७ वर्ष झाले आहे. माझ्याकडे झोपेच्या गोळ्या सुद्धा होत्या पण त्यानेही काही फरक पडला नाही. म्हणून मी शेवट करीत आहे, यामध्ये कोणाचाही दोष नाही', असंही त्यांनी पत्रात स्पष्ट केलं.
हेही वाचा -एकत्र जीवन-मरणाची घेतली होती शपथ, प्रियकराने प्रेयसीला दिलं विष पण स्वत: मात्र..
'सागर, स्नेहा, ज्योती तुम्हा सर्वांना आणि तुमच्या मम्मीला पण समोर पाहण्याची इच्छा होती. पण ती माझी इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. सागर, स्नेहा तुम्हाला मम्मीला व्यवस्थित सांभाळावे लागणार आहे. तीला कसलाही त्रास होऊ देवू नका, ती खूप हळवी आहे तीला धीर द्या, हीच माझी इच्छा आहे', अशी मुलांकडून शेवटची इच्छाही व्यक्त शिंदे यांनी व्यक्त केली.
चंद्रकांत शिंदे यांच्या आत्महत्येमुळे राज्य राखील पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.