जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / VIDEO : क्षुल्लक कारणावरुन आर्मीचा जवान भडकला; रागाच्या भरात एकाचा जीवच घेतला, तिघे जखमी

VIDEO : क्षुल्लक कारणावरुन आर्मीचा जवान भडकला; रागाच्या भरात एकाचा जीवच घेतला, तिघे जखमी

VIDEO : क्षुल्लक कारणावरुन आर्मीचा जवान भडकला; रागाच्या भरात एकाचा जीवच घेतला, तिघे जखमी

एका छोट्याशा कारणावरुन हा वाद इतका वाढला की एकाचा मृत्यू झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

गाजियाबाद, 4 जुलै : गाजियाबादमधील (Ghaziabad) मुरादनगर (Muradnagar) येथे मारहाणीची एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका क्षुल्लक करणावरुन सैन्याच्या जवानाने लोखंडाच्या पाईपाने आणि काठीने तीन तरुणांना बेदम मारहाण केली. जवानाच्या दोन साथीदारांनीही त्याला या गुन्ह्यात साथ दिली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी (Ghaziabad Police)  आरोपी जवानासह त्याच्या दोन मित्रांनाही अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैन्याचा जवान नितीन आणि त्याचे दोन साथीदार अश्विन आणि आकाश नदीजवळ बसले होते. या दरम्यान काही तरुणांनी त्यांना अडवलं. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू झाला. नितिनला इतका राग आला की, त्याने त्याच्या जवळ पडलेला लोखंडाचा पाइप मारण्यासाठी उचलला. अश्निन आणि आकाशनेदेखील काठ्या उचलल्या आणि तरुणांना मारहाण सुरू केली. या प्रकरणात तरुणाला इतकी मारहाण केली की त्यातच त्याचा मृत्यू झाला. हे ही वाचा- राजस्थानमध्ये गुंडाराज, स्फोटकं लावून उडवलं गरीब महिलेचं घर

जाहिरात

पोलिसांनी या प्रकरणात नितिन आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात तपास करणारे पोलीस अधिकारी केके पांडे यांनी सांगितलं की, या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे, ज्यात दिसत आहे की, नदीकिनारी बसलेल्या आरोपींची अडवणूक केली आहे. आरोपींकडील खाण्या-पिण्याच्या पदार्थंजवळ एक बॉटलदेखील दिसून येत आहे. दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारहाण आणि आरोपी पळत असल्याचं दिसत आहे. यामुळे परिसरात गोंधळ उडाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात