नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर: तुम्हाला माहीत आहे का 1 नोव्हेंबरपासून नवीन नियम लागू होणार आहेत. या नव्या नियमांचा तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो. या नियमांबाबत तुम्ही जागरुक आहात का? तुम्हाला हे नियम माहीत नसतीस तर घाबरू नका आम्ही तुम्हाला सांगत आहोत काय नवीन बदल होणार आहेत ते. नियम 1: तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर 1 नोव्हेंबरपासून तुमच्या डिपॉझिटवर व्याजदर बदलणार आहेत. बँकेच्या या निर्णयामुळे 42 कोटी ग्राहकांवर परिणाम होणार आहे. SBI ने 9 ऑक्टोबर रोजी केलेल्या घोषणेनुसार 1 लाख रुपयांपर्यंतच्या डिपोझिटवर 0.25 व्याजदर कमी करून 3.25 करण्यात आला आहे. म्हणजेच 3.25 टक्के 1 लाखांपर्यंतच्या डिपोझिटवर व्याज मिळणार आहे. तर एक लाखांपेक्षा जास्त रकमेवर रेपोरेटनुसार व्याजदर ठरवले जाणार आहेत. नियम 2 : तुम्ही व्यवसायिक असला तर तुमच्यासाठी हा नियम महत्त्वाचा आहे. अर्थ मंत्रालयाने पेमेंटसंदर्भात काही नियम बदलले आहेत. 1 नोव्हेंबरपासून तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. ग्राहक किंवा मर्चेंट्स यांच्याकडून डिजिटल पेमेंटवर कोणताही कर लागणार नाही अथवा अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही. CBDTने इच्छुक बँका आणि पेमेंट सिस्टिम प्रोवायडर्सला याबाबत तसं आवाहन केलं आहे. दरम्यान हा नियम 50 कोटींपेक्षा जास्त टर्नओवर असणाऱ्या कंपन्यांना लागू आहे. इलेक्ट्रॉनिक मोडचा वापर करून पेमेंट केल्यास कोणतही अतिरिक्त शुल्क भरावं लागणार नाही. हा नियम 1 नोव्हेंबरपासून लागू केला जाणार आहे. नियम ३: देशभरातील बँकांचे कार्यालय उघडण्याची आणि बंद होण्याची वेळ एकसारखी असावी असा प्रस्ताव देण्यात आला होता मात्र ग्राहक आणि व्यापारी यांच्या गरजा लक्षात घेता महाराष्ट्रातील बँकांच्या वेळापत्रकार काही बदल करण्यात आले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वेळापत्रकात मोठा बदल हा 1 नोव्हेंबर पासून होणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार निवासी क्षेत्रातील बँका सकाळी 9 ते संध्याकाळी 4 पर्यंत चालू राहणार आहेत. मात्र ग्राहकांसाठी कामकाजाची वेळ ही 9 ते 3 अशी असेल. व्यापारी क्षेत्रातील खातेदार किंवा व्यावसायिकांसाठी 11 ते 6 कामकाजाची वेळ असणार आहे. या सर्व नियमांची अंमलबजावणी ही 1 नोव्हेंबरपासून होणार आहे. त्यामुळे या बदलेल्या नियमांचा थेट आपल्यावर परिणाम होणार आहे. या बदललेल्या नियमांमुळे थोडा त्रास सहन करावा लागू शकतो. VIDEO : फेरीवाल्यांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी, महिलेला केली जबर मारहाण
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







