वर्षभरानंतर मुलगी सापडली तीदेखील पॉर्न साईटवर, आईनेच पाहिले फोटो आणि व्हिडिओ!

वर्षभरानंतर मुलगी सापडली तीदेखील पॉर्न साईटवर, आईनेच पाहिले फोटो आणि व्हिडिओ!

काही महिन्यांपूर्वी हरवलेल्या मुलीचे फोटो पॉर्न साईटवर पाहिल्यानंतर आईच्या पायाखालची जमिन हादरली.

  • Share this:

फ्लॉरिडा, 27 ऑक्टोबर : अमेरिकेत बेपत्ता झालेल्या एक तरुणीचा जवळपास एक वर्षानंतर शोध लागला आहे. विशेष म्हणजे, जेव्हा आपल्या किशोरवयीन मुलीचे काही फोटो आणि व्हिडिओ तिच्या आईने एका पॉर्न साइटवर पाहिले. या सगळ्या प्रकारामुळे आईला धक्काच बसला. काही महिन्यांपूर्वी हरवलेल्या मुलीचे फोटो पॉर्न साईटवर पाहिल्यानंतर आईच्या पायाखालची जमिन हादरली. या सगळ्यानंतर प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ इतर 60 पेक्षा जास्त वेबसाइटवर सापडले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मुलीचा शोध घेतला असून तिला पळवून नेणाऱ्या आणि तिच्यावर ही वेळ आणणाऱ्या ओरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, पोलिसांनी मुलीची या सगळ्यातून सुटका करत तिला तिच्या आईकडे पाठवण्यात आलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने तिची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे. परंतू या सगळ्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

अहवालानुसार, काही व्हिडिओंमध्ये एक तरुण किशोरवयीन मुलाशी लैंगिक संबंध असल्याचंही दाखवत होता. फेब्रुवारी महिन्यात तरुणीचं अपहरण करण्यात आलं होतं. तर 30 वर्षीय ख्रिस्तोफर जॉनसन असे व्हिडिओतील युवकाचे नाव आहे. जॉन्सनने तरुणीचे अपहरण करून तिच्यावर जबरदस्ती करत अश्लील व्हिडिओ काढले असल्याची माहिती पीडितेने पोलिसांना दिली आहे.

इतर बातम्या - ऑफिसच्या कॉकटेल पार्टीमध्ये दारू पिऊन धिंगाणा, मद्यपीसोबत तरुणींचे अश्लील डान्स

पोलिसांनी आरोपीच्या गाडीचा मागोवा घेतला आणि त्याला अटक केली आणि त्यावेळी त्याच्यासोबक अपहरण केलेली तरूणीदेखी होती. पोलिसांना आरोपीच्या अपार्टमेंटचा पत्ता गर्भपात चिकित्सालयातून मिळाला. तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तिचा अनेक वेळा गर्भपात केला आहे. तिला गर्भपात करण्यासाठी क्लिनिकमध्ये नेण्यात आलं होतं. पीडित तरुणीच्या आरोपानंतर मात्र, आरोपी जॉन्सनने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Published by: Renuka Dhaybar
First published: October 27, 2019, 11:08 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading