सुशांत आत्महत्या प्रकरण : गळा दाबल्याची जखम नाही, 5 डॉक्टरांच्या टीमने सांगितलं हे कारण

सुशांत आत्महत्या प्रकरण : गळा दाबल्याची जखम नाही, 5 डॉक्टरांच्या टीमने सांगितलं हे कारण

या प्रकणात आतापर्यंत 23 लोकांचा जबाब नोंदवण्यात आला असला तरीही अजूनही काही लोकांची चौकशी करण्यात येणार आहे.

  • Share this:

आशिष सिंह, मुंबई, 24 जून : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येला काही दिवस लोटल्यानंतरही या प्रकरणातील तपास अजून सुरू आहे. सुशांतच्या मृत्यूबद्दल अनेक संशय व्यक्त करण्यात येत असल्याने पोलिसांनी त्या दृष्टीनेही तपास सुरू केला आहे. आता या प्रकरणात 5 डॉक्टरांच्या टीमने पुन्हा एकदा पोस्टमार्टम रिपोर्टचा अभ्यास करून त्याबाबतचं निरीक्षण समोर ठेवलं आहे.

सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू गळफास घेतल्यानेच झाल्याचं डॉक्टरांच्या या टीमकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, सुशांतच्या शरीरावर गळा दाबण्याच्या किंवा नखाच्या कोणत्याही जखमा नाहीत, असंही या टीमकडून सांगण्यात आलं आहे. या प्रकणात आतापर्यंत 23 लोकांचा जबाब नोंदवण्यात आला असला तरीही अजूनही काही लोकांची चौकशी करण्यात येणार आहे.

कुणाची होणार चौकशी?

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याचे कुटुंब, मित्र, आधीचे मॅनेजर, टीममधील इतर सदस्य, घरात काम करणारे लोक आणि गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यासह एकूण 23 जणांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे. तसंच यशराज फिल्म्सकडून 2012 साली सुशांतसोबत करण्यात आलेल्याकॉन्ट्रॅक्टची कॉपीही जमा करण्यात आली आहे.

बॉलिवूडमध्ये आरोपांची राळ

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील विविध सिलेब्रेटिंनी समोर येत खळबळजनक आरोप केले. नेपोटिझमच्या मुद्द्यावरून अभिनेत्री कंगना रणौत हिने अनेकांवर निशाणा साधला, तर अभिनय क्षेत्राप्रमाणे संगीत क्षेत्रातही माफिया असल्याचा आरोप गायक सोनू निगमने (Sonu Nigam) केला.

First published: June 24, 2020, 9:33 PM IST

ताज्या बातम्या