मुंबई, 16 फेब्रुवारी : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. लिव्ह इनमधून हत्याकांडाच्या घटनाही समोर येत आहे. मागील काही दिवसात तीन घटना घडल्या, ज्यांनी देशाला हादरवलं. यामध्ये महाराष्ट्रातीलही एका घटनेचा समावेश आहे. या तिन्ही घटनांमध्ये एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे प्रियकराने आपल्या लिव्ह-इन-पार्टनरची हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावली. मग या ती प्रमुख घटना कोणत्या, त्याचा घेतलेला हा आढावा.
- हत्या करून मृतदेह गादीमध्ये टाकला
नुकतीच महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यात घडलेल्या घटनेचाही यामध्ये समावेश आहे. एकाने आपल्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केली. यानंतर तिचा मृतदेह गादीमध्ये भरून टाकला. यानंतर आरोपी प्रियकर पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी प्रियकर हा बेरोजगार होता आणि दोघांमध्ये अनेकदा भांडण होत असे. अशाच एका भांडणाच्या वेळी त्याने पेशाने परिचारिका असलेल्या 37 वर्षीय मेघाचा खून केला. तो आणि मेघा तुळींज परिसरात एकत्र राहत होते. दोघांमध्ये भांडणे व्हायची. अशाच एका भांडणात आरोपीने रागाच्या भरात मेघाचा खून करून मृतदेह बेडमध्ये टाकला, अशी आरोपी प्रियकराने पोलीस चौकशीत सांगितले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
- प्रियकराने निक्कीचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला
दिल्लीमध्ये पुन्हा एकदा श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली. दिल्लीच्या नजफगडमधील मित्रांव गावातून ही घटना समोर आल्यानंतर ग्रामस्थ हादरून गेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे साहिल गहलोत असं या प्रकरणातील आरोपीचं नाव असून, निक्की यादव असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. साहिल आणि निक्की हे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने आपल्या प्रेयसिला आपलं लग्न दुसऱ्या एका महिलेसोबत ठरल्याचं सांगितलं नव्हतं. जेव्हा निक्कीला साहिलच्या लग्नाबाबत कळालं तेव्हा त्यांच्यामध्ये वाद झाला आणि या वादातूनच आरोपीने निक्कीची हत्या केली. त्याने तिचा मृतदेह त्याच्या ढाब्यात असलेल्या फ्रीजमध्ये ठेवला होता. या घटनेबाबत बोलताना स्थानिकांनी सांगितलं की, जेव्हा पोलीस मंगळवारी सकाळी साहिल गहलोत याचा शोध घेत गावात पोहोचले तेव्हा त्यांना घटनेबाबत माहिती मिळाली. त्याने आपल्या प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह ढाब्यामध्ये असलेल्या फ्रीजमध्ये ठेवला होता. हेही वाचा - IITच्या विद्यार्थ्यासोबत लैंगिक अत्याचार प्रकरण, आणखी धक्कादायक माहिती समोर
- प्रेयसीची हत्या करून मृतदेहाची तुकडे
दिल्ली पोलिसांनी तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबला 12 नोव्हेंबरला श्रद्धा वालकरच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली होती. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनावाला याने 18 मे रोजी संध्याकाळी श्रद्धा वालकर (27) हिचा खून केला आणि तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले, जे त्याने दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्याच्या निवासस्थानी सुमारे तीन आठवडे 300 लिटरच्या फ्रीजमध्ये ठेवले होते. तो अनेक दिवस दिल्लीच्या विविध भागात तिचे तुकडे फेकून देत होता.