मुंबई, 20 जून : : सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सची चलती आहे. मागच्या वर्षभरात अनेक स्टार किड्सनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे सारा अली खान. केदारनाथ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या साराचा पहिलाच सिनेमा हिट झाला. त्यानंतर ती रणवीर सिंहसोबत सिंबामध्ये दिसली. हा सिनेमा सुद्धा सुपरहिट ठरला आणि साराकडे सिनेमांची रांगच लागली. पण आता सारानं तिचे वडील सैफ अली खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र यासोबत तिनं एक अट सुद्धा ठेवली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सारानं तिच्या फिल्मी करिअरविषयी दिलखुलास गप्पा मारल्या.
सुरुवातीला सारा बाबा सैफसोबतच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा होती. काही महिन्यापूर्वी रिलीज झालेल्या सैफच्या जवानी जानेमन या सिनेमातून सारा बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असं बोललं जात होतं. पण नंतर सारानं हा सिनेमा सोडला. ही भूमिका नंतर अलाया फर्निचरवालाला ऑफर करण्यात आली. पण आता सारानं पुन्हा एकदा सारानं सैफसोबत सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सारा म्हणाली, मला आशा आहे की तो दिवस लवकरच येईल आणि मी बाबांसोबत सिनेमात काम करेन.
सैफसोबत काम करण्यासाठी मात्र साराची एक अट आहे. ज्याबद्दल बोलताना सारा म्हणाली, मी बाबांसोबत काम करायला तयार आहे मात्र त्यासाठी माझी एकच अट आहे ती म्हणजे सिनेमाची स्क्रिप्ट चांगली असायला हवी. जेव्हा एखादा चांगला प्रोजेक्ट असेल तेव्हा आम्ही दोघं प्रेक्षकांना ऑनस्क्रीन नक्कीच एकत्र दिसू. त्यांच्यासोबत एका सिनेमात काम करणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.
सुशांतच्या तथाकथित गर्लफ्रेंडचे महेश भट्ट यांच्याबरोबरचे PHOTO व्हायरल
या मुलाखतीत सारा आपल्या वडीलांचा सिनेमा जवानी जानेमन बाबतही बोलली. ती म्हणाली, मी हा सिनेमा पाहिला. त्यात ते खूपच कूल, मजेदार अंदाजात दिसले. अलायानंही पहिल्याच सिनेमात कमालीचा अभिनय केला आहे. त्या दोघांमधली वडील-मुलीची केमिस्ट्री जबरदस्त होती. मी स्वतः जाऊन बाबांना सांगितलं होतं की मला त्यांचा सिनेमा खूप आवडला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.