उल्हासनगर, 8 ऑगस्ट: वडापाव सेंटरमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत एकचा होरपळून मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले आहेत. रवीचंद गुप्ता असं मृत व्यक्तीचं नाव असून ते 90 टक्के भाजले गेले होते. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. उल्हासनगर येथील कॅम्प नंबर 4 च्या व्हिनस चौक परिसरात शनिवारी ही घटना घडली. घटनेचा लाईव्ह व्हिडीओ समोर आला आहे.
हेही वाचा...शिवाजी महाराजांचा पुतळा सरकारनं रातोरात हटवला, शिवभक्तांमध्ये संतापाची लाट
मिळालेली माहिती अशी की, जय मातादी वडापाव सेंटरमध्ये शनिवारी दुपारी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोट होताच दुकानाला भीषण आग लागली. आगीत 5 जण होरपळून जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दुकान मालक, कामगार आणि ग्राहकांचा समावेश आहे. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. उल्हासनगर अग्निशमन दलाच्या तीन गाड्या सध्या घटनास्थळी असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. आता आगीतून सगळ्यांना बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
LIVE VIDEO:वडापाव सेंटरमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; 5 जण होरपळले#gascylinderblast #Ulhasnagar #Vadapav pic.twitter.com/9CdY2fyvPI
— News18Lokmat (@News18lokmat) August 8, 2020
दुकानाचा स्लॅब कोसळून कामगाराचा जागेवरच मृत्यू
दरम्यान, उल्हासनगरमधील कॅम्प नंबर 1 भागात शुक्रवारी एका दुकानाचा स्लॅब कोसळून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आशा कोल्ड्रिंक असं दुकानाचे नाव आहे. अग्निशमन दलाचे जवानांनी रेस्कू ऑपरेशन राबवून ढिगाऱ्याखालून चार जणांचा सुरक्षित बाहेर काढले.
आशा कोल्ड्रिंक दुकानात शटरचं काम सुरू होतं. त्याचवेळी दुकानाचा स्लॅब कोसळला होता.
हेही वाचा...दीपक साठेंनी जीवाची बाजी लावून वाचवले प्रवाशांचे प्राण, वाचा भावाची FB पोस्ट
विशेष म्हणजे स्लॅब कोसळला तेव्हा दुकानाचं शटर बंद होतं. ढिगाऱ्याखाली दबून शटर काम करणाऱ्या कामगारांचा जागेवरच मृत्यू झाला. हे दुकान 40 वर्षे जुन्या इमारतीत होते. मात्र, ही इमारत धोकादायक इमारतीच्या यादीत नसल्याची माहिती मिळाली आहे.