डोंबिवली, 28 एप्रिल : मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर मुंबईच्या उपनगरातही कोरोनाने थैमान घातले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिसरात 6 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. तसंच कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या काही रुग्णांना 14 दिवसानंतरही लक्षणे आढळून आली आहे, त्यामुळे क्वारंटाइन 14 वरुन 28 दिवसांचा करण्यात आला आहे. आज 28 एप्रिल रोजी प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 143 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. आज आढळलेल्या सहा रुग्णामध्ये बहुतांश रुग्ण हे मुंबईत काम करणारे असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये एका वृत्तवाहिनीच्या वार्ताहाराचा समावेश आहे. हेही वाचा - प्रत्येक कोरोनामुक्त व्यक्ती कोरोनाग्रस्तासाठी करू शकत नाही रक्तदान, या आहेत अटी मुंबईत काम करणारा हॉटेलचा कर्मचारी, भाजी मंडईतील सुरक्षा रक्षक, दादर इथं खाजगी कंपनीचा अभियंता आणि एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. यात एका 12 वर्षीय मुलाचा देखील समावेश आहे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 143 रुग्ण आढळून आले आहे. यापैकी 45 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. तर एकूण 95 रुग्णावर उपचार सुरू आहे. आतापर्यंत केडीएमसीच्या परिसरात 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 14 नव्हे आता 28 दिवस क्वारंटाइन कोरोना साथीचा प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका क्षेत्रात विविध स्तरावर युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे नमुने गोळा करुन त्यांना खबरदारी म्हणून पुढील 14 दिवस क्वारंटाइन करण्यात येत आहे. हेही वाचा - असाही एक योद्धा.. स्वत: डायलिसिसवर असून कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये बजावतोय कर्तव्य परंतु, काही रुग्णांना 14 दिवसानंतरही लक्षणे आढळून आलेली आहेत, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे असे रुग्ण 14 दिवसानंतर इतर रुग्णांच्या संपर्कात येवून इतरांनाही बाधित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यापुढे कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती तसंच प्रवास इतिहास असणाऱ्या प्रवाशांचा क्वारंटाइन कालावधी 14 दिवसावरुन 28 दिवसांपर्यंत करण्यात आला आहे. त्याअन्वये सदर रुग्णांना, रुग्णाच्या संपर्कात आल्यापासून किंवा बाधित भागातून प्रवास केल्यापासून 28 दिवसापर्यंत क्वारंटाइन करण्यात येणार आहे. संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.