Home /News /national /

आनंद महिंद्रांनी रिक्षाचालकाला सल्लागारपदी घेण्याची व्यक्त केली इच्छा, कोरोनाच्या संकटात कल्पकता बघून झाले इम्प्रेस

आनंद महिंद्रांनी रिक्षाचालकाला सल्लागारपदी घेण्याची व्यक्त केली इच्छा, कोरोनाच्या संकटात कल्पकता बघून झाले इम्प्रेस

आनंद महिंद्रा हे त्यांच्या नावीन्यपूर्ण विचार व दृष्टिकोनामुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात.

    मुंबई, 24 एप्रिल : महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी एक रिक्षा चालकाला त्यांच संशोधन पाहून रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटर (R&D) आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंट टीममध्ये सल्लागार पदाची ऑफर दिली आहे. त्यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यामध्ये त्यांनी रिक्षाचालकाचं कौतुक केलं आहे. देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. कोरोनावर (Coronavirus) नियंत्रण आणण्यासाठी सरकारने लॉकडाऊन लागू केला आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे हा मुख्य हेतू आहे. महिना ओलांडल्यानंतर अत्यावश्यक सेवांसह काही मूलभूत गोष्टीही सुरू झाल्या आहेत. सोशल मीडियावर नेहमीच आपल्या इनोव्हेटिव्ह ट्विट, वेगळा दृष्टीकोन यामुळे चर्चेत असतात. त्यांनी आज एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये एक रिक्षाचालकात कोरोनाच्या धोक्यापासून आपला व प्रवाशांचा बचाव करण्यासाठी रिक्षेच्या संरचनेत बदल केला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग अत्यंत आवश्यक असतं. सरकारकडूनही वारंवार हेच सांगितलं जात आहे. त्यामुळे या व्हिडीओमधील पठ्ठ्याने रिक्षामध्ये प्रवाशांना बसण्यासाठी चार वेगवेगळे भाग केले आहे. त्यामुळे प्रवासी एकमेकांना पाहूही शकत नाही. त्यामुळे कोरोना व्हायरसचा धोका नसेल. आनंद महिद्रा यांनी हा ट्विट करीत या रिक्षा चालकाचं कौतुक केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, आपले लोक विविध परिस्थिती स्वीकारत त्यात नावीन्यपूर्णता आणत असतात. हे पाहून मी चकीत होतो. या रिक्षा चालकाला R&D & product development teams मध्ये सल्लागार म्हणून घ्यायला हवं. त्यांच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. यामध्ये रिक्षाचालकाचं कौतुक करण्यात आलं आहे. याशिवाय आनंद महिंद्रा यांच्या तातडीने निर्णय घेण्याच्या तयारीबद्दल अप्रुप व्यक्त केलं आहे. संबंधित -अमेरिकेत मृत्यूचा तांडव! कोरोनामुळे 50000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू, 15000 गंभीर
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या