मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /शाईफेकीचं समर्थन नाही, मात्र चंद्रकांतदादांना... खडसेंनी पुन्हा डिवचलं

शाईफेकीचं समर्थन नाही, मात्र चंद्रकांतदादांना... खडसेंनी पुन्हा डिवचलं

चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे

चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे

शनिवारी भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली. यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. आता यावर राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India

जळगाव, 11 डिसेंबर : शनिवारी भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली. यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. आता यावर राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. शाई फेकीचं मी समर्थन करणार नाही, परंतु ती शाई का फेकली?  याचं चिंतन चंद्रकांत दादांनी करावं असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटलं एकनाथ खडसे यांनी? 

एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्याावर झालेल्या शाईफेकीवर प्रतिक्रिया दिली  आहे. त्यांनी यावरून चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई फेकीचं मी समर्थन करणार नाही. परंतु ती शाई का फेकली गेली याचं चंद्रकांत दादांनी चिंतन करण्याची आवश्यकता आहे. चंद्रकांत पाटलांनी जे वक्तव्य केलं ते करायला नको होतं असा सूर समाज माध्यमांमधून उमटत आहे. भाजप नेत्यांकडून महापुरुषांबाबत जे वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहेत, त्यमुळे समाजामध्ये संताप असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :  खडसे 'तेव्हाच' संपले; दूध संघातील विजयानंतर महाजनांचा घणाघात

संतापाचा एवढा उद्रेक कसा होतो? 

शाईफेक झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात गुंडागर्दी सुरू असल्याचं म्हटलं होतं. यावर देखील एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात गुंडागर्डी चालू असेल तर तिचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी तुमची आहे. राज्यात तुमचं सरकार आहे. संतापाचा एवढा उद्रेक कसा होतो याचा चंद्रकांत पाटील यांनी विचार करायला हवा. असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Chandrakant patil, Eknath khadse, Jalgaon, NCP