सोलापूर, 19 ऑगस्ट : सध्या अनेक नेत्यांची ईडी चौकशी सुरू आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना ईडीच्या चौकशीनंतर तुरुंगात राहावे लागत आहे. याशिवाय राष्ट्रवादीच्या 5 वरिष्ठ नेत्यांची लवकरच ईडी चौकशी होणार असल्याचंही वृत्त समोर आलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यानंतर आता कोणाचा नंबर लागणार याकडे सर्वांचीच नजर आहे. दरम्यान माजी मंत्री शिवसेना नेते दिलीप सोपल यांच्यावर ईडीची चौकशी लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं धक्कादायक वक्तव्य भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी केलं आहे. अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी थेट शिवसेना नेते दिलीप सोपल यांना ईडीची धमकी दिली आहे. या वक्तव्यावर संताप व्यक्त केला जात आहे. ईडीच्या चौकशीपूर्वी भाजप नेत्यांना याबाबत कशी माहिती मिळते, याबाबत महाविकास आघाडीकडून सवाल उपस्थित केला जात आहे. यापुढे ते म्हणाले की, शिवसेना नेते दिलीप सोपल मगरुरीपणा केला तर आमच्याकडे ईडी आहे. ‘मी दोषी नाही, माझ्यावरील आरोप खोटे’; ‘त्या’ प्रकरणावरील सुनावणीदरम्यान संजय राऊतांचा दावा यामुळे कोण कोण कुठे कुठे जाऊन बसत आहे. शिवसेनेचे काही मित्र जेलमध्ये जाऊन बसले आहे. दिलीप सोपल यांचा आर्यन नावाचा साखर कारखाना आहे. या कारखान्याची एफआरपीची बिले थकीत आहेत. काही दिवसापूर्वी दिलीप सोपल यांनी आर्यन कारखान्याची संबंध नसल्याचे वक्तव्य केले होते. यावरूनच आमदार राजेंद्र राऊत यांनी शिवसेना नेते सोपल यांना ईडीची लावण्याची धमकी दिली. ईडी कार्यालयात माजी मंत्री सोपल याच्याविरोधात तक्रार पुढील आठवड्यात देणार आहे, अशीही माहिती समोर आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या बड्या पाच नेत्यांची लवकरच ईडीकडून चौकशी होणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. ही खळबळजनक माहिती माढ्याचे भाजपचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी दिली. लवासा आणि जलसंपदा विभागात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी एका बड्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा यामध्ये समावेश असल्याचा दावा, खासदार निंबाळकर यांनी केला आहे. खासदार निंबाळकर यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपासून माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर कारवाई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच भाजपचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी अजित पवार यांचे नाव न घेता राष्ट्रवादीच्या दहा पैकी पाच नेत्यांवर लवकरच कारवाई होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे पाच बडे नेते कोण याविषयी चर्चा सुरू झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.