लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था मोडकळीस! परिस्थिती रुळावर येण्यासाठी एका वर्षापेक्षा अधिक कालावधी जाणार-सर्व्हे

लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था मोडकळीस! परिस्थिती रुळावर येण्यासाठी एका वर्षापेक्षा अधिक कालावधी जाणार-सर्व्हे

या सर्व्हेमध्ये 300 पेक्षा अधिक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे मत लक्षात घेतले आहे. यातील 66 टक्के सीईओ सुक्ष्म, लघू आणि मध्यम उपक्रम (MSME) क्षेत्रातील आहेत. या सर्व्हेतून अशा निष्कर्ष निघतो आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये असणारी सुस्ती दीर्घकाळासाठी राहणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 मे  : कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने (CII) दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवहारांवर मोठा वाईट परिणाम झाला आहे. सीआयआयने रविवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा (CEO) एक सर्व्हे जारी केला. सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 65 टक्के कंपन्यांचं म्हणणं आहे की, एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये त्यांच्या उत्पन्नात 40 टक्के घसरण होईल.  या सर्व्हेतून अशा निष्कर्ष निघतो आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये असणारी सुस्ती दीर्घकाळासाठी राहणार आहे. सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या सीईओंपैकी 45 टक्के सीईओंचे असे म्हणणे आहे की, ही अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी साधारण एका वर्षापेक्षा अधिक कालावधी जाईल.

(हे वाचा-लॉकडाऊनमध्ये नोकरी जाण्याचा धोका! घरबसल्या या व्यवसायातून करू शकता लाखोंची कमाई)

या सर्व्हेमध्ये 300 पेक्षा अधिक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे मत लक्षात घेतले आहे. यातील 66 टक्के सीईओ सुक्ष्म, लघू आणि मध्यम उपक्रम (MSME) क्षेत्रातील आहेत. यातील अर्ध्याहून अधिक कंपन्यांचे म्हणणे असे आहे की, लॉकडाऊन संपल्यानंतर संबधित क्षेत्रांतील नोकऱ्यांमध्ये कपात होईल. यापैकी 45 टक्के सीईओंनी सांगितले की साधारण 10 ते 15 टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर लॉकडाऊननंतर गदा येईल.

(हे वाचा-करदात्यांना आयकर विभागाने पाठवला अलर्ट! होऊ शकतं मोठं नुकसान,वाचा काय आहे प्रकरण)

या सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 66 टक्के सीईओंनी अशी माहिती दिली की अद्याप त्यांच्या कंंपनीने पगारात कपात केलेली नाही. मात्र लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवहारांवर मोठा परिणाम होत असल्याचे सीआयआयचे म्हणणे आहे. 33 टक्के कंपन्यांचं असं म्हणणं आहे की 2020-21 यास संपूर्ण आर्थिक वर्षात त्यांच्या उत्पन्नात 40 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण होईल. 32 टक्के कंपन्यांनुसार त्यांच्या उत्पन्नात 20 ते 40 टक्क्यांनी घसरण होण्याची शक्यता आहे.

सीआयआयचे महासंचालक चंद्रजीत बनर्जी  यांनी अशी माहिती दिली की, ' कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक आहे. मात्र यामुळे आर्थिक व्यवहारांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे उद्योगांना प्रोत्साहन पॅकेज देण्याची आवश्यकता आहे.'

संपादन- जान्हवी भाटकर

First published: May 3, 2020, 6:06 PM IST

ताज्या बातम्या