नवी दिल्ली, 03 मे : आयकर विभागाने (Income Tax Department) करदात्यांना आयटी रिफंड (IT Refund) देण्याचे सांगणाऱ्या बनावट ईमेलबाबत पूर्वसूचना दिली आहे. आयकर विभागाने रविवारी ट्वीट करत या 'फिशींग मेल'बाबत माहिती दिली. करदात्यांना त्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करत यासारख्या कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन आयकर विभागाने केले आहे. रिफंड देण्याचे कबूल करणारा कोणताही मेल किंवा मेसेज आयकर विभागाकडून पाठवण्यात आलेला नाही. 8 ते 20 एप्रिल दरम्यान विविध श्रेणीच्या करदात्यांना 9000 कोटींपेक्षा जास्त किंमतीचे 14 लाख रिफंड जारी करण्यात आले आहेत. यामध्ये व्यक्तिगत, हिंदू अविभाजित परिवार, प्रॉप्रायटर, फर्म, कॉरपोरेट, स्टार्टअप्स आणि लघू व मध्यम स्तरावरील उपक्रम (SME) या श्रेणींवरील करदात्यांचा समावेश आहे.
(हे वाचा-या बँकेत खातं आहे तर मिळणार 5 लाख रूपये! RBI चा मोठा निर्णय)
कोरोनाचे संकट लक्षात घेता, सरकारने आयकर विभागाला असे निर्देश दिले होते की लवकरात लवकर करदात्यांना आयटी रिफंड देण्यात यावे. ज्यानंतर आयकर विभागाकडून या टॅक्सपेयर्सना मेल पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत 1.74 लाख प्रकरणात कन्फर्मेशन मेल देखील पाठवण्यात आला आहे. 8 ते 20 एप्रिल या कालावधी दरम्यान जवळपास 9000 कोटींचा रिफंड जारी करण्यात आला होता. यामध्ये 5 लाखां किंमतीपर्यंतच्या 14 लाख रिफंडच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.
Taxpayers Beware!
Please do not click on any fake link which promises to give refund. These are phishing messages and are not sent by the Income Tax Department. Please read the details carefully here https://t.co/90VSq32w0K #StaySafe #IndiaFightsCorona #StayAtHome#BeAware pic.twitter.com/gfF2RZDTpu
— Income Tax India (@IncomeTaxIndia) May 3, 2020
आयकर विभागाने या ट्वीटमधून सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. रिफंड देतो असं सांगणाऱ्या कोणत्याही बनावट लिंकवर क्लिक करू नका असं आवाहन या ट्वीटमधून करण्यात आले आहे. हे फिशींग मेसेज असून आयकर विभागाने ते पाठवलेले नाहीत. https://incometaxindia.gov.in/Pages/report-phishing.aspx या लिंकवर दिलेली माहिती देखील त्यांनी काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन केले आहे.
(हे वाचा-...तर आता लॉकडाऊनमध्ये सुरू होणार दारूची ऑनलाइन डिलिव्हरी? वाचा सविस्तर)
त्यामध्ये आयकर विभागाने सांगितले आहे की, आयकर विभाग कधीही मेलच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती विचारत नाही. तुमचे पिन नंबर, पासवर्ड, क्रेडिट कार्ड संबधित माहिती, बँकेसंदर्भातील माहिती किंवा इतर आर्थिक बाबींशी संबधित माहिती ई-मेलच्या माध्यमातून विचारत नाही. त्यामुळे जर असा कोणताही मेल किंवा मेसेज तुम्हाला आला असेल तर खबरदारी बाळगा असं आवाहन आम्ही तुम्हाला करत आहोत.
संपादन - जान्हवी भाटकर