मराठी बातम्या /बातम्या /मनी /

लॉकडाऊनमध्ये नोकरी जाण्याचा धोका! घरबसल्या या व्यवसायातून करू शकता लाखोंची कमाई

लॉकडाऊनमध्ये नोकरी जाण्याचा धोका! घरबसल्या या व्यवसायातून करू शकता लाखोंची कमाई

पाचवी करन्सी आहे चीनची रेनमिनबी. एकूण जागतिक करन्सीमध्ये 1.95 टक्के पाउंडची भागीदारी आहे. याची व्हॅल्यू जवळपास 213 अब्ज डॉसर आहे.

पाचवी करन्सी आहे चीनची रेनमिनबी. एकूण जागतिक करन्सीमध्ये 1.95 टक्के पाउंडची भागीदारी आहे. याची व्हॅल्यू जवळपास 213 अब्ज डॉसर आहे.

लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकरीवर गदा आली आहे तर काहींनी अजूनही नोकरी जाण्याची भीती सतावत आहे. अशावेळी घरबसल्या तुम्ही 'या' बिझनेस आयडियाचा विचार करू शकता.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 03 मे : कोरोना व्हायरस लॉकडाऊन (Coronavirus Lockdown) मुळे देशातील अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. कोव्हिड-19 चा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी देखील वाढवण्यात आला आहे. ज्याप्रमाणे प्रवासी मजूरांसमोर कमाई कशी करायची हा प्रश्न निर्माण झाला आहे, त्याचप्रमाणे अनेक क्षेत्रातील नोकरदारांसमोर नोकरी जाण्याचे संकट आहे. कोरोनाच्या या संकटकाळात जर एखाद्याला नोकरी जाण्याची भीती असेल, तर काही छोट्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करणे येणाऱ्या काळात फायदेशीर ठरेल. त्यामध्ये शेती हा देखील एक उत्तम पर्याय आहे. पारंपारिक शेती तर आहेच पण त्याला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास या व्यवसायामध्ये उत्तम कमाई आहे. शेतीमधील अशीच एक बिझनेस आयडिया आम्ही आज सांगणार आहोत. (हे वाचा-करदात्यांना आयकर विभागाने पाठवला अलर्ट! होऊ शकतं मोठं नुकसान,वाचा काय आहे प्रकरण) तुम्ही बटन मशरूम (Button Mashroom) ची शेती करू शकता. सध्या अनेकजण ऑनलाइन व्हिडीओ पाहून घरातच अनेक पदार्थ बनवण्यास शिकले आहेत. दरम्यान या पदार्थांमध्ये मशरूमचा वापर जास्त असल्यामुळे त्याची मागणी देखील वाढली आहे. बटन मशरूममध्ये जीवनसत्त्व आणि मिनरल्सचे प्रमाण जास्त असते. आरोग्यासाठी चांगले असल्यामुळे मशरूमचा वापर वाढू लागला आहे. बाजारामध्ये मशरूमची किंमत 300 ते 350 रुपये किलो इतकी झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी देखील पारंपरिक शेतीपेक्षा मशरूमला अधिक पसंती दिली आहे. 50 हजारांपासून करू शकता सुरूवात कंपोस्ट खताचा वापर करून बटन मशरूमची शेती करता येते. एक क्विंटल कंपोस्ट खतामध्ये दीड किलो बियाणं लावता येईल. 4 ते 5 क्विंटल कंपोस्ट बनवून जवळपास 2000 किलो मशरूमचे उत्पन्न घेता येईल. जर 2000 किलो मशरून प्रति किलो 150 रुपयांनी विकली गेली तरी साधारण 3 लाख रूपये मिळतील. 50 हजार रूपये गुंतवणूक म्हणून वापरले असाल तर अडीच लाखांचा फायदाच होतो. दरम्यान याकरता होणारा खर्च 50 हजारांपेक्षा कमीच असतो. प्रति वर्ग मीटर 10 कि‍लोग्राम मशरूम  आरामात होतो. (हे वाचा- या बँकेत खातं आहे तर मिळणार 5 लाख रूपये! RBI चा मोठा निर्णय) ही शेती करण्यासाठी कमीत कमी 40 बाय 30 फुट जागेमध्ये 3-3 फुटांचे रॅक बनवून मशरूमची शेती केली जाते. कंपोस्ट तयार करण्यासाठी, धान्याचा पेंढा भिजवून ठेवा आणि एक दिवसानंतर डीएपी, यूरिया, पोटॅश, जिप्सम, कॅल्शियम आणि कार्बो फ्यूराडन  मिसळून हे सर्व सडण्यासाठी ठेवून द्या. कंपोस्ट सुमारे 45 दिवसांनंतर तयार होते. शेणखत आणि माती समान प्रमाणात मिसळून साधारण दीड इंचाचा थर करा. त्यावर कंपोस्टचा थर सुमारे दोन ते तीन इंचापर्यंत पसरवा. ओलावा राहण्यासाठी मशरूम लावलेल्या ठिकाणी 2-3 दिवसांनी फवारणी करा. त्यानंतर एकदा कंपोस्टचा आणखी एक दोन इंच जाड असा थर टाका. (हे वाचा-...तर आता लॉकडाऊनमध्ये सुरू होणार दारूची ऑनलाइन डिलिव्हरी? वाचा सविस्तर) सर्व कृषि विद्यापिठांमध्ये मशरूमच्या शेतीबाबत शिक्षण दिले जाते. जर मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर योग्य प्रशिक्षण आवश्यक आहे. संपादन- जान्हवी भाटकर
First published:

पुढील बातम्या