जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / मद्यधुंद अवस्थेत ट्रकचालकाने दिली धडक, भीषण अपघातात एकाचा मृत्यू, भंडाऱ्यातील घटना

मद्यधुंद अवस्थेत ट्रकचालकाने दिली धडक, भीषण अपघातात एकाचा मृत्यू, भंडाऱ्यातील घटना

मद्यधुंद अवस्थेत ट्रकचालकाने दिली धडक, भीषण अपघातात एकाचा मृत्यू, भंडाऱ्यातील घटना

दोन ट्रक समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला आहे.

  • -MIN READ Bhandara,Maharashtra
  • Last Updated :

नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा, 5 मार्च : राज्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटना घडत आहेत. औरंगाबादमधील एका विद्यार्थ्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने त्याचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन ट्रक समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. नागपूरवरून रायपूरकडे भरधाव वेगात जाणाऱ्या मिनी ट्रकने लाखनी वरून समोरून येणाऱ्या ट्रॅकला जोरधार धडक दिली. भंडारा जिल्हातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील पलाडीजवळ ही भीषण घटना घडली आहे. यात मिनी ट्रकच्या चालकाचा उपचार करण्यासाठी नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे. मृताचे नाव प्रशांत बाबुराव डोंगरे (37) असे आहे. तर अजित शेंडे (35), असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नागपूरवरून रायपुरकडे जात असलेला मिनी ट्रक (क्रमांक एम एच 40 बी एल 7617) चालक मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने जात होता. त्याने लाखनी वरून समोरून येणारा ट्रकला (क्रमांक एम एच 18 ए.पी 4784) आमोरासमोर धडक दिली. यात मिनी ट्रकच्या कॅबिनचा समोरच्या भागाचा अक्षरशः चेंदामेंदा होऊन ट्रक चालक व क्लीनर दाबल्या गेले. पलाडी जवळ ही भीषण अपघाताची घटना घडली. वडील, बहीण घरात झोपलेले, दहावीच्या मुलाने रात्रीच्या सुमारास काढली कार अन्.., हादरवणारी घटना या घटनेची माहिती गडेगाव महामार्ग पोलिसांना देण्यात आली. यानंतर घटनेची माहिती मिळताच, महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल होत मिनी ट्रकमध्ये असलेल्या ट्रक चालक आणि क्लिनरला बाहेर काढून उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भरती करण्यात आले. मात्र, यात मिनी ट्रक चालक प्रशांत बाबुराव डोंगरे यांचा रस्त्यात मृत्यू झाला आहे. तर जखमीवर उपचार सुरू आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात