मुंबई, 22 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Death Case) ड्रग्ज कनेक्शन समोर आल्याने बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा कसून तपास करण्यासाठी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) कसून चौकशी करत आहे. सध्या या प्रकरणात बॉलिवूडमधील स्टार अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत. श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह आणि सारा अली खान सारख्या सिनेस्टार नंतर आता बॉलिवूडची स्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण हीचं देखील या तपासात नाव समोर आलं आहे.
या सगळ्यात अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) हिने अनेक कलाकारांवर टीका केली. दीपिकांचं नाव पुढे आल्यानंतर कंगनाने पुन्हा एकदा बॉलिवूडवर टीका केली आहे. कंगनाने ट्वीटच्या माध्यमातून या प्रकरणावर टोला लगावला आहे. कंगना ट्वीटमध्ये लिहलं की- 'माझ्या मागे म्हणा, नैराश्य हे ड्रग्जच्या गैरवापराचा परिणाम आहे. त्यामुळे ज्या उच्च समाज आणि श्रीमंत स्टार मुलांचा चांगले असल्याचा दावा केला जातो, ज्यांचं चांगलं पालन-पोषण होतं. ते त्यांच्या मॅनेजरला विचारतात- माल आहे का?' कंगनाच्या या ट्वीटनंतर आता नेटकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
देशात रुग्ण बरे होण्याची आकडेवारी दिलासादायक, पाहा 24 तासांतील लेटेस्ट अपडेट
नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) केलेल्या ड्रग्स प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पादुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) अशी नावं समोर आली आहेत. त्यापैकी सर्वात धक्कादायक आणि सर्वात मोठे नाव म्हणजे दीपिका पादुकोण. यावेळी दीपिकाचे ड्रग्ज चॅटही समोर आले आहेत.
मोठी बातमी! संदीप देशपांडेसह आणखी 3 मनसैनिकांना पोलिसांनी केली अटक
समोर आलं दीपिकाचं ड्रग्ज चॅट
दीपिका पादुकोणचं जया साहाची कंपनीची मॅनेजर करिश्मासोबत ड्रग चॅट समोर आलं आहे. यामध्ये NCB कडून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. या चॅटमध्ये दीपिका आणि करिश्मा डॅग्जविषयी बोलत होते. यामध्ये दीपिका करिश्माला विचारत होती की, 'तुझ्याकडे माल आहे का'. याच्या उत्तरात करिश्मा म्हणते की- 'हो... पण घरी आहे. मी आता वांद्रेला आहे...'
दीपिका आणि श्रद्धा कपूरच्या चॅट्सनंतर आता कोण आहे NCBच्या रडारवर?
यावर करिश्मा कोणा अमितचं नाव घेते आणि म्हणते की मी अमितला पाठवू शकते. यावर दीपिका म्हणाली- 'हो, प्लीज.' काही वेळानंतर करिश्मा म्हणाली की, 'अमित घेऊन येत आहे.' यावर दीपिका विचारते - 'हॅश आहे का?' पण त्यावर करिश्मा म्हणते की 'हॅश नाही गांजा आहे.'