नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : देशात कोरोनाचा धोका काही थांबवण्याचं नाव घेत नाहीये. रोज समोर येणाऱ्या कोरोनाच्या नव्या रुग्णांमुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. आताही देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाची 74903 नवीन प्रकरणं समोर आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 1053 लोकांचा मृत्यू झाला आहे.
देशात कोरोनाची संख्या 55 लाखांपेक्षा जास्त आहे. कोरोनाची आतापर्यंतची एकूण सकारात्मक प्रकरणे 5,562,483 इतकी आहेत तर आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4497867 इतकी आहे. देशात आतापर्यंत 88935 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर या जीवघेण्या संसर्गाच्या धोक्यामध्ये रुग्ण बरे होण्याचा दर 80.86 टक्के आहे ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल.
मोठी बातमी! संदीप देशपांडेसह आणखी 3 मनसैनिकांना पोलिसांनी केली अटक
भारतात वेगाने कोरोना व्हायरस पसरण्याचं कारण काय?
भारतात सध्या Coronavirus ने थैमान घातलं असून, वेगाने रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे भारताढचं संकट वाढत आहे. जगभरात आता अमेरिकेखालोखाल भारतातली रुग्णसंख्या आहे. आपल्याकडे कडक Lockdown काळात सुरुवातीला कोरोना आटोक्यात होता. मात्र लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर आले. त्यामुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
भारतात इतक्या वेगाने कोरोना कसा काय पसरत आहे हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यामागील एक धक्कादायक कारण समोर आलं आहे. हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायॉलॉजीच्या (centre for cellular and molecular biology, Hyderabad) संशोधनात समोर आले आहे की, भारतात कोरोनाच्या A2a या स्ट्रेनने मोठ्या प्रमाणात रुग्ण संक्रमित केले आहेत.
गोव्यामध्ये रेड अलर्ट तर मुंबईत ढगाळ, महाराष्ट्राच्या या भागांत आज आसमानी संकट
देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी (Covid-19 patients) 70 टक्के रुग्ण हे A2a स्ट्रेनमुळे संक्रमित झाले आहेत. त्यामुळे भारतात दररोज इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. जगभरात देखील A2a स्ट्रेनमुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण कोरोना संक्रमित होत आहेत. सुरुवातीला भारतात A3i स्ट्रेनमुळे कोरोना संक्रमित रुग्णांचं प्रमाण 41 टक्के होतं पण ते नंतर कमी होत गेलं. मात्र आता रुग्ण A2a स्ट्रेनने कोरोना संक्रमित होत असल्यामुळं संख्या वाढताना दिसून येत आहे. जगभरात देखील याच प्रकारच्या कोरोना व्हायरसवर लस तयार करण्याचे काम सुरु आहे.