बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा खेळ! दीपिका आणि श्रद्धा कपूरच्या चॅट्सनंतर आता कोण आहे NCBच्या रडारवर?

बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा खेळ! दीपिका आणि श्रद्धा कपूरच्या चॅट्सनंतर आता कोण आहे NCBच्या रडारवर?

बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा खेळ! दीपिका आणि श्रद्धा कपूरच्या चॅट्स वाचून चाहत्यांना बसेल धक्का

  • Share this:

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात समोर आलेल्या ड्रग्स कनेश्नवर NCB चौकशी करत आहे. या तपासामध्ये बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार अभिनेत्यांची आणि अभिनेत्रींची नावं समोर येत आहेत. श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह आणि सारा अली खान सारख्या सिनेस्टार नंतर आता बॉलिवूडची स्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण हीचं देखील या तपासात नाव समोर आलं आहे.

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) केलेल्या ड्रग्स प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पादुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) अशी नावं समोर आली आहेत. त्यापैकी सर्वात धक्कादायक आणि सर्वात मोठे नाव म्हणजे दीपिका पादुकोण. यावेळी दीपिकाचे ड्रग्ज चॅटही समोर आले आहेत.

समोर आलं दीपिकाचं ड्रग्ज चॅट

दीपिका पादुकोणचं जया साहाची कंपनीची मॅनेजर करिश्मासोबत ड्रग चॅट समोर आलं आहे. यामध्ये NCB कडून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. या चॅटमध्ये दीपिका आणि करिश्मा डॅग्जविषयी बोलत होते. यामध्ये दीपिका करिश्माला विचारत होती की, 'तुझ्याकडे माल आहे का'. याच्या उत्तरात करिश्मा म्हणते की- 'हो... पण घरी आहे. मी आता वांद्रेला आहे...'

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन, शूटिंगदरम्यान झाला कोरोना

यावर करिश्मा कोणा अमितचं नाव घेते आणि म्हणते की मी अमितला पाठवू शकते. यावर दीपिका म्हणाली- 'हो, प्लीज.' काही वेळानंतर करिश्मा म्हणाली की, 'अमित घेऊन येत आहे.' यावर दीपिका विचारते - 'हॅश आहे का?' पण त्यावर करिश्मा म्हणते की 'हॅश नाही गांजा आहे.'

बॉलिवूडमधलं हे धक्कादायक ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर NCB ने मंगळवारी जया साहा, तिच्या कंपनीची मॅनेजर करिश्मा आणि सुशांतची मॅनेजर श्रुती मोदी हिला चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यामुळे आजच्या चौकशीत काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. तर श्रद्धा कपूरशिवाय 3 अभिनेत्रींच्या ड्रग चॅटसुद्धा समोर आलं आहे.

ड्रग्ज प्रकरणात अडकली श्रद्धा कपूर?

NCB ने जया साहाची चार तास चौकशी केली होती. या चौकशीत ड्रग्जविषयी अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. त्यातला एक ड्रग चॅट आहे तो म्हणजे श्रद्धा कपूर जयाचा. ज्यामध्ये श्रद्धा जयाला सीबीडी तेलासाठी विचारत आहेत.

COVID-19: पुण्यातही नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या पेशंट्समध्ये झाली वाढ!

जया म्हणते - 'तू खाली आलीस तर मला सांग.'

श्रद्धा- 'मी खाली येऊन तुला देईन.

जया- 'हॅलो, मी आज सीबीडी ऑइल जिंजसोबत पाठवत आहे.'

श्रद्धा कपूर- 'हाय .. धन्यवाद.' यावर जया हसत हसत उत्तर देते.

मग श्रद्धा म्हणाली- 'ऐक, मला अजूनही SLB भेटायचा आहे'.

दरम्यान, रियासोबत चौकशीदरम्यान चित्रपटसृष्टीतील 25 जणांचं नाव समोर आलं होतं. अशात एनसीबी याचा तपास करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सारा अली खान एका हाय प्रोफाइल ड्रग्ज पॅडलरच्या संपर्कात होती. ज्याचा एनसीबी शोध घेत होती. साराकडून ड्रग्ज घेत रियाने सुशांत सिंह राजपूतपर्यंत पोहोचवलं होतं. गेल्या काही दिवसांत सुशांत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शनचा शोध करणाऱ्या एजंसी एनसीबीला मोठं यश मिळालं होतं. मुंबईत विविध ठिकाणी छापेमारी केल्यानंतर एनसीबीने 6 जणांचा पकडलं होतं. या 6 जणांचे संबंध बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटशी असल्याचे सांगिजले जात आहे. या प्रकरणात आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 22, 2020, 8:26 AM IST

ताज्या बातम्या