मुंबई, 26 डिसेंबर : गेल्या काही दिवसांपासून प्राण्यांना मारहाणीच्या, त्यांच्यावरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. विशेषत कुत्र्यांना (DOG) अमानुषपणे मारहाण केल्याच्या, गाडीला बांधून खेचल्याचे व्हिडीओ (VIDEO) समोर आले आहेत. मात्र आता एक असा व्हिडीओ पाहायला मिळतो आहे, जो प्रत्येकाच्या काळजाला हात घालणारा आहे. मेलेल्या माणुसकीलाही जिवंत करेल असा हा व्हिडीओ. एका अज्ञात व्यक्तीनं भुकेलेल्या कुत्र्याला खायला देताच या मुक्या जिवाच्या डोळ्यात चटकन पाणी आलं (DOG CRYING).
सोशल मीडियावर (SOCIAL MEDIA) रडणाऱ्या एका कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल (VIDEO VIRAL) होतो आहे. डेली व्हायरल युट्युब अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
व्हिडीओत पाहू शकता. एक कुत्रा कारच्या मागे धावत येतं. कारच्या दरवाजाजवळ उभं राहून आपल्या मागील दोन पायांवर उभं राहून पुढील पायांनी माणसांनी हात जोडावेत तसं जोडतो. कारमधून एक व्यक्ती बाहेर येते. तेव्हा त्या व्यक्तीचे पायही पडतो. यानंतर ती व्यक्ती या कुत्र्याला खायला देते. खायला मिळताच कुत्र्याचे डोळे भरून येतात तो रडू लागतो.
हे वाचा - शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ! हरणापुढे 'जंगल का राजा'ही फेल! शिकारीचा VIDEO VIRAL
हा व्हिडीओ चीनच्या (CHINA) झिझाँगमधील असल्याचं इंडिया टाइम्सनं सांगितलं आहे. एका अज्ञात महिलेनं या कुत्र्याला खायला दिलं. खायला मिळताच या मुक्या जीवालाही अश्रू अनावर झाले. त्याला अक्षरशः रडू कोसळलं. कदाचित या कुत्र्याला खूपच भूक लागली होती. त्याला काहीच खायला मिळालं नव्हतं. त्याच्या पोटात काहीच नव्हतं.
Xiaoxiang Morning Post शी बोलताना या महिलेनं सांगितलं की, तिनं या कुत्र्याला गाडीतून घरी घेऊन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तिनं दिलेलं खाल्ल्यानंतर तो कुत्रा तिथून निघून गेला.
हे वाचा - VIDEO: अपघातात जखमी झालं हत्तीचं पिल्लू; माणसाप्रमाणे CPR देऊन वाचले प्राण
या व्हिडीओ पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुत्र्याला असं भावुक झालेलं पाहून कित्येकांच्या डोळ्यातही अश्रू आले. शिवाय ज्या महिलेनं या कुत्र्याला मदत केली, त्याला पोटभर खाऊ घातलं, त्याची भूक भागवली त्या महिलेचंही सर्वांनी कौतुक केलं आहे.