मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ! हरणापुढे 'जंगल का राजा'ही ठरला फेल! शिकारीचा VIDEO VIRAL

शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ! हरणापुढे 'जंगल का राजा'ही ठरला फेल! शिकारीचा VIDEO VIRAL

भल्या भल्या प्राण्यांचं तोंडचं पाणी पळवणाऱ्या या सिंहाला (lion) एवढ्याशा हरणानं (deer) मात्र चांगलीच मात दिली आहे.

भल्या भल्या प्राण्यांचं तोंडचं पाणी पळवणाऱ्या या सिंहाला (lion) एवढ्याशा हरणानं (deer) मात्र चांगलीच मात दिली आहे.

भल्या भल्या प्राण्यांचं तोंडचं पाणी पळवणाऱ्या या सिंहाला (lion) एवढ्याशा हरणानं (deer) मात्र चांगलीच मात दिली आहे.

मुंबई, 26 डिसेंबर : इटुकला उंदीर, छोटंसं माकड यांनी सिंहाला (lion) धडा शिकवल्याच्या गोष्टी आपण लहानपणी वाचल्याच आहेत. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते हे आपण बोधकथेतून ऐकत आलो आहोत. मात्र याचा प्रत्यय प्रत्यक्षातही आलं आहे. आजवर जी म्हण आपण बोधकथेतून समजून घेत आलो ती प्रत्यक्षातही पाहता आली. सोशल मीडियावर एक व्हिडीओ (social media viral video) सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. सिंह हरणाची (deer) शिकार करतानाचा हा व्हिडीओ.

एवढ्याशा हरणापुढे भलामोठा असलेला जंगलाचा राजाही फेल ठरला आहे. हरणाची शिकार करायला आला होता. पण हरणानं त्याला चांगलाच चकवा दिला.

एका नदीवर हे हरण शांतपणे पाणी पिताना दिसतं आहे. पाणी पित असलं तरी ते सावध आहे. तसं पाहिलं तर त्याच्या आजूबाजूला कुणीच नाही. पण तितक्यात त्याला थोडीशी कसलीतरी चाहूल लागते, कसला तरी आवाज येतो. आपल्या आजूबाजूला कुणीतरी आहे, हे त्याला समजतं आणि तो लगेचच सावध होतो. त्याचं लक्ष त्याच आवाजाच्या दिशेनं असतं.

आणि हे काय...आजूबाजूला कुणीतरी आहे हा त्याला झालेला फक्त भास नाही तर प्रत्यक्षात तिथं कुणीतरी होतं. हा दुसरा तिसरा कुणी नाही तर जंगलाचा राजा सिंहच तिथं दबा धरून बसला होता. तो हरणाची शिकार करायला धावत येतो. तो इतक्या वेगानं येतो की अक्षरश:  मातीचा धुरळा उडतो. हरणही आपला जीव वाचवण्यासाठी पळण्याचा प्रयत्न करतं.

हे वाचा - कारचं बोनेट उघडलं आणि चालकाची बोबडीच वळली, नेमकं काय घडलं पाहा थरारक VIDEO

पण सिंहाच्या शक्तीपुढे आणि वेगापुढे आपला टिकाव काही लागणार नाही याची कल्पना त्याला होती. त्यामुळे आधी तो सिंह ज्या दिशेनं धावतो त्या दिशेनं आपण पळत आहोत असंच दाखवतो. सिंहदेखील त्याच दिशेनं त्याच्यावर हल्ला करायला जातो आणि सिंह मानेवर हल्ला करणार त्याचवेळी हरण आपली पळण्याची दिशा बदलतो. ज्या दिशेनं सिंह धावत आलेला असतो त्या दिशेनं हरण पळून जातं. तोपर्यंत शिकारीसाठी वेगात धावत आलेला सिंह त्याच्यापासून खूप दूर गेलेला असतो. त्याच्या तावडीत काही ते हरण सापडत नाही.

हे वाचा - VIDEO - काय म्हणावं या चिमुरड्याला; पालकांवर संतापला, थेट पोलिसांनाच फोन लावला

एरवी शिकार झाल्यानंतर कोणताही जीव आपले प्राण वाचवण्यासाठी धडपड करतो. पण समयसूचकता राखून शिकार होण्याआधीच आपला बचाव करणारे जीव क्वचितच दिसून येतात. अशापैकीच एक म्हणजे हे हरण. त्याच्या बुद्धीला खरंच दाद द्यायला हवी.

First published:
top videos

    Tags: Social media viral, Viral, Viral videos, Wild animal