छतरपूर (म.प्र) 08 मे : प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. नीरज पाठक हत्याकांडाचा (Dr. Neeraj Pathak Murder case) अखेर पोलिसांनी उलगडा केला आहे. पोलिसांनी हत्येच्या आरोपामध्ये डॉ. नीरज पाठक यांच्या पत्ती ममता पाठक (Mamata Pathak) यांना अटक केली आहे. ममता यांनी पोलिस तपासात पतीच्या हत्येची कबुली दिली. आधी डॉ. नीरज यांना जेवणातून विष (Poison) दिलं आणि नंतर त्यांना करंट (Electric Shock) दिल्याचं ममता यांनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांपासून वाचण्यासाठी एका व्हिडिओतील माहितीचा वापर ममता यांनी केला होता. (वाचा- नागपूरात जमावाकडून दोन डॉक्टर्सला मारहाण; डॉक्टर संपावर जाण्याच्या तयारीत ) मध्यप्रदेशच्या छतरपूरमघ्ये डॉ. नीरज पाठक यांची 29 एप्रिल रोजी हत्या झाली होती. या प्रकरपणाचा अखेर उलगडा झाला आहे. डॉ. नीपज आणि त्यांची प्रोफेसर पत्नी ममता पाठक यांच्यात सुमारे 11 वर्षांपासून वाद होते. त्यामुळं ते वेगवेगळे राहत होते. पण आठ महिन्यांपूर्वीच सप्टेंबर 2020 मध्ये वाद संपवत दोघे पुन्हा एकत्र आले होते. त्यानंतर ममता मुलाला घेऊन डॉ. नीरज पाठक यांच्या घरी राहायला आल्या होत्या. ममता यांना डॉ.नीरज पाठक यांच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळं त्यांच्यामध्ये वाग व्हायचे. दोघांनी यापूर्वी तीन वेळा एकमेकांच्या विरोधात पोलिसांत तक्रारही केली होती. या हत्येच्या प्रकरणानंतर पोलिसांना ममता पाठक यांच्यावर संशय होता. त्यानुसार पोलिसांनी 7 मे रोजी ममता पाठक यांना ताब्यात घेत चौकशी केली. त्यानंतर त्यांना शनिवारी अटक करण्यात आली. ममता यांनी व्यवस्थित कट रचत पतीची हत्या केली होती. ममता यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांना एका व्हिडिओत पाहिले होते की, विष दिल्यानंतर मृतदेह दोन दिवस तसाच राहिला तर विष दिल्याचं समोर येत नाही. त्यामुळम ममता यांनी पतीला जेवणातून विष दिलं. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला की नाही, हे तपासण्यासाठी त्यांनी डॉ. पाठक यांना करंटही दिला. त्यानंतर मुलाला घेऊन त्या झाशीला निघून गेल्या. जाताना रस्त्यात नदीत त्यांनी एक्सटेन्शन बोर्ड नदीत फेकला होता. पाठक यांचा मृतदेह 1 मे रोजी आढळून आला होता. (वाचा- 2 मुलांना सोडून प्रियकरासोबत पत्नी फरार, विरहात पतीनं घेतला आत्महत्येचा निर्णय ) पाठक दाम्पत्यामध्ये आधीपासूनच वाद होते. काही दिवसांपूर्वीच पाठक यांचा एक ऑडियोही समोर आला होता. त्यात ते पत्नी जेवायला देत नसून आपल्याला बंधक बनवून ठेवल्याचा आरोप पाठक यांनी केला होता. एखा नातेवाईकाशी बोलतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पोलिसांना पाठक यांच्या पत्नीवर शंका होती, त्यामुळं पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली आणि अखेर या हत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.