Home /News /nagpur /

नागपूरात जमावाकडून दोन डॉक्टर्सला मारहाण; डॉक्टर संपावर जाण्याच्या तयारीत

नागपूरात जमावाकडून दोन डॉक्टर्सला मारहाण; डॉक्टर संपावर जाण्याच्या तयारीत

नागपूर येथे दोन डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर डॉक्टरांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

नागपूर, 8 मे: कोरोनाच्या या संकटकाळात डॉक्टर्स (Doctor), नर्सेस (Nurse) आणि वैद्यकीय अधिकारी अगदी देवदूत बनून कार्य करत आहेत. मात्र, अशा परिस्थितीत सुद्धा पोलीस, डॉक्टरांवर हल्ले होण्याच्या घटना समोर येत आहेत. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या दोन डॉक्टरांना जमावाकडून बेदम मारहाण (Doctors beaten by mob) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (Nagpur Government Hospital) दोन निवासी डॉक्टरांना मारहाण झाली आहे. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मेडिकल चौकात पाच ते सहा जणांच्या टोळक्याने या दोन्ही डॉक्टरांना मारहाण केली आहे. या घटनेनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा संपावर जाऊ असा इशाराच नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी दिला आहे. दरम्यान, हल्लेखोर हे कोण होते आणि त्यांनी या दोन डॉक्टरांना मारहाण का केली? या संदर्भातील माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये. वाचा: संगमनेर पोलिसांवर हल्ला प्रकरण; चौघांना अटक, CCTV फूटेजवरुन इतरांचा शोध सुरू संगमनेरमध्ये पोलिसावर हल्ला  दोन दिवसांपूर्वी जमावाने पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. लॉकडाऊनच्या काळात गर्दी का केली अशी विचारणा करताच जमावाने पोलिसावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Nagpur

पुढील बातम्या