मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होताच अ‍ॅक्शन मोडमध्ये, ओबीसी आरक्षणासाठी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होताच अ‍ॅक्शन मोडमध्ये, ओबीसी आरक्षणासाठी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते अ‍ॅक्शन मोडमध्ये (Devendra Fadnavis on action mode) आले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते अ‍ॅक्शन मोडमध्ये (Devendra Fadnavis on action mode) आले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते अ‍ॅक्शन मोडमध्ये (Devendra Fadnavis on action mode) आले.

मुंबई, 1 जुलै : भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज लगेच कामाचा धडाका लावला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते अ‍ॅक्शन मोडमध्ये (Devendra Fadnavis on action mode) आले. देवेंद्र फडणवीस यांनी आज उपमुख्यमंत्रिपदाचा कारभार स्वीकारला. ते आज मंत्रालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. संबंधित बैठक ही ओबीसी आरक्षणासंदर्भात होती. ओबीसी आरक्षणासाठी तातडीने कारवाई करावी. त्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व काही करावं, अशा प्रकारच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीला भाजप नेते प्रवीण दरेकर, संजय कुटे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेचे शिंदे गट आणि भाजप यांनी सरकार स्थापन केलं. या नव्या सरकारचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करतील, ते मुख्यमंत्री होतील, असा अंदाज बांधला जात होता. पण त्यांनी गुरुवारी दुपारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन मोठा राजकीय बॉम्ब टाकला. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस नाही तर एकनाथ शिंदे होतील, अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे भाजपच्या हायकमांडने हा निर्णय घेतला. पण भाजपच्या दिल्लीतील हायकमांडने घेतलेल्या या निर्णयावर फडणवीस नाराज असल्याची बातमी नंतर समोर आली. या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना देवेंद्र फडणवीस आपल्या जबाबादरीत कोणताही कसूर सोडताना दिसत नाहीयत.

('आमचा शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प', एकनाथ शिंदेंचं मोठं विधान)

देवेंद्र फडणवीस यांनी काल उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्रालय गाठलं. मंत्रालयात नव्या सरकारची पहिली कॅबिनेट बैठक झाली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संबंधित माहिती दिली. यावेळी फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना जलयुक्त शिवार योजना पुन्हा कशी सुरु करता येईल याबाबत नियोजन करण्याची सूचना केली. तसेच मेट्रोचं कारशेड आरे कॉलनीतच बनवण्याबाबत कोर्टात बाजू मांडण्यासाठी तयारी करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले. या दोन सूचना केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी आज अधिकाऱ्यांना ओबीसी आरक्षणाबाबत सूचना केल्या.

देवेंद्र फडणवीस आज मंत्रालयात दाखल झाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात कोरोना प्रतिबंधक म्हणून काचेचे बॅरिकेट्स लावले होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी ते बॅरिकेट्स आधी अधिकाऱ्यांना काढायला सांगितले. त्यानंतर त्यांनी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी ओबीसी आरक्षणावर चर्चा केली. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबतचा संपूर्ण आढावा घेतला. तसेच ओबीसी आरक्षण लागू व्हावं यासाठी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. ओबीसींचं राजकीय आरक्षण लागू व्हावं यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतील ते सर्व करा, असं फडणवीस अधिकाऱ्यांना म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, ओबीसी OBC