पुणे 25 मे : पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक कॅफे (Goodluck Cafe) नावाचे एक 70 वर्षापेक्षा जूने रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंट म्हणजे पुण्याची एक वेगळी ओळख आहे. आत्तापर्यंत हा कॅफे अनेक काळापासून आपली वेगळी ओळख जपून आहे. गुडलक कॅफे 1934 ला पुण्यात (Goodluck Cafe in Pune) सुरू झाले. गेल्या 70 वर्षांहून अधिक वर्षे हे रेस्टॉरंट इराणी चहा, बन मस्का देत आहे . पूर्वीच्या काळी उपाहारगृहे फार कमी होती. अशावेळी पुण्यामध्ये हे गुडलक कॅफे सुरू झाले. हेही वाचा - हा अनुभव जीवन बदलवून टाकणारा, रिक्षाचालकाच्या घरी बिर्याणी खाल्ल्यावर अमेरिकन महिलेची पोस्ट व्हायरल पुण्यातील जुने इराणी कॅफे या रेस्टॉरंट सोबतच अजूनही काही ईराणी कॅफे त्या वेळेस होते. मात्र काळाच्या ओघात अनेक कॅफे बंद पडले. तरी देखील आजतागायत गूडलक कॅफे हा दिमाखदारपणे उभा आहे. याबाबत गुडलक कॅफे चे मालक कासीम यक्षी यांच्याशी संवाद साधला . गुडलक रेस्टॉरंट, डेक्कन जिमखाना येथील या कॅफेचा 70 वर्षांपासून त्यावेळेसचा मेन्यू बन मस्का, ऑम्लेट, सुप्रसिद्ध चहा आणि मोजक्या नॉन व्हेज डिशेस आजही कायम आहे. यासोबतच गेल्या काही वर्षात यात भर पडली आहे. इराणी चहाची रेसिपी ही इतर चहापेक्षा वेगळी असते. हेही वाचा - भाजप-राष्ट्रवादी राड्यानंतर आज दोन्ही पक्ष उतरले रस्त्यावर, पुण्यात नेमकं घडतंय तरी काय? सर्व कलाकारांची गुडलकला पहिली पसंती गुडलक ने पुण्याची स्थित्यंतरे पहिली आहे. १९६१ मध्ये पानशेतच्या पुराच्या वेळेस गुडलक पाण्यात बुडाले होते. किंवा पूर्वी झालेल्या दंगली असो या सर्वांचा परिणाम गुडलकवर झाला होता.देवानंद, गुरुदत्त, रेहमान, नाना पाटेकर, डेविड धवन, राज कपूर सारखे मोठे कलाकारांची खास पसंती गुडलकला होती. मात्र, आता यक्षी यांची ही शेवटी पिढी आहे जी गुडलक चालवत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.