Home /News /maharashtra /

हा अनुभव जीवन बदलवून टाकणारा, रिक्षाचालकाच्या घरी बिर्याणी खाल्ल्यावर अमेरिकन महिलेची पोस्ट व्हायरल

हा अनुभव जीवन बदलवून टाकणारा, रिक्षाचालकाच्या घरी बिर्याणी खाल्ल्यावर अमेरिकन महिलेची पोस्ट व्हायरल

भारताची संस्कृती ही अतिथी देवो भव (Atithi Devo Bhava) आहे. या संस्कृतीचा अनुभव अमेरिकेतील महिलेला आला आहे. (Indian Culture) सोशल मीडियावर या महिलेची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. (American Woman Post Viral)

  पुणे, 18 मे : भारताची संस्कृती ही अतिथी देवो भव (Atithi Devo Bhava) आहे. या संस्कृतीचा अनुभव अमेरिकेतील महिलेला आला आहे. (Indian Culture) सोशल मीडियावर या महिलेची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. (American Woman Post Viral) या पोस्टला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच अनेक लाईक्सही मिळत आहेत. किम रिंकी असे या महिलेचे नाव आहे. त्या डिमॅटिक ग्लोबल प्रोजेक्ट इंजिनिअरिंग अकादमीच्या संचालक आहेत. नेमकं काय घडलं - किम रिंकी या गेल्या आठवड्यात कामानिमित्त पुण्यात आल्या होत्या. या भेटीदरम्यान त्यांना अत्यंत सुखद असा अनुभव आला. त्यांनी थेट एका रिक्षाचालकाच्या घरी बिर्याणीचा आस्वाद घेतला. तसेच बिर्याणी खातानाचा फोटोही त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला. सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी काय लिहिलंय - आपल्या पोस्टमध्ये किंम यांनी लिहिलंय की, 'अँथनी या रिक्षाचालकाने मला या आठवड्यात त्याच्या घरी पाहुणे म्हणून बोलावले. अँथनी मला पुण्यामधील प्रवासादरम्यान मदत करतो. त्याने बोलावल्यानतंर मी त्याच्या घरी गेले आणि बिर्याणीचा आस्वाद घेतला. यावेळी आम्ही छान गप्पा केल्या, बिअरी प्यायले. इतकेच नव्हे तर त्याच्या मोठ्या मुलाचा वाढदिवसाचा केकही खाल्ला. माझ्या कुटुंबाच्या तुलनेने तो गरीब आहे. मात्र, मनाने, खरंच खूप श्रीमंत आहे. किम हिने पुढे लिहिले की, येथील शेजारापाजारी सहज एकमेकांकडे जातात. फ्रिज नसल्याने अन्न उरले तर वाटून खातात. माझ्यासारख्या एका अनोळखी सातासमुद्रापलीकडून आलेल्या महिलेचे अगदी प्रेमाने स्वागत करतात. याप्रकारे आलेल्या अनुभवाने मी अगदी भारावून गेले. पण खरे सांगायचे झाल्यास मलाच माझी आता लाज वाटायला लागली आहे. मी आपल्या कोषात रमलेली होती. त्यामुळे इतरांच्या जीवनमानाबद्दल मी जागरुक नव्हते, असे मला जाणवले. हेही वाचा - पुन्हा एकदा हसवून लोटपोट करायला येतेय दयाबेन, आता दिसणार नवा अंदाज
  रिक्षाचालक अँथनीकडे मी गेले. तिथे बिर्याणी खाल्ली. त्याच्या कुटुंबीयाने माझे आदरातिथ्य केले. हा सर्व अनुभव माझे आयुष्य बदलवून टाकणारा होता, असे म्हटले तरी पुरेसे ठरणार नाही. कारण या अनुभवातून मी अजूनही बाहेर आलेले नाही.' दरम्यान, किम यांच्या पोस्टनंतर नेटकरी किमचे तसेच आपुलकीने किम यांना आपल्या घरी घेऊन प्रेमाने आदरातिथ्य करणाऱ्या रिक्षाचालक अँथनीचे कौतुक करत आहे. किम यांची पोस्ट प्रचंड व्हायरल होत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Culture and tradition, India, Pune

  पुढील बातम्या