Home /News /national /

नितीश कुमारांना मोठा धक्का; जदयूचे 6 आमदार लागले भाजपच्या गळाला

नितीश कुमारांना मोठा धक्का; जदयूचे 6 आमदार लागले भाजपच्या गळाला

अरुणाचल प्रदेशात आलेल्या राजकीय भूकंपाचा परिणाम बिहारच्या राजकारणावरही होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे.

    पाटणा, 25 डिसेंबर: बिहारमध्ये (Bihar) मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षानंच (BJP) जनता दल युनायटेडला (JDU) अरुणाचल प्रदेशमध्ये मोठा झटका दिला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये (Arunachal Pradesh) भाजपनं जदयूचे 6 आमदार फोडले आहे. त्यामुळे अरुणाचल प्रदेशात जदयुचा आता केवळ एकच आमदार शिल्लक राहिला आहे. यावर बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयुचे राष्ट्रीय अध्यक्ष नीतीश कुमार यांनी मात्र मौन धारण केलं आहे. त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हेही वाचा...‘लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक काय मिस केलं?’ रणबीरच्या उत्तराचा VIDEO व्हायरल अरुणाचल प्रदेशात आलेल्या राजकीय भूकंपाचा परिणाम बिहारच्या राजकारणावरही होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत नितीश कुमार मोठा निर्णय देखील घेऊ शकतात, असंही समजतं. भाजपच्या गोटात सामील झालेल्यांमध्ये रमगोंगचे आमदार तालीम तबोह, चायांग्ताजोचे आमदार हेयेंग मंग्फी, तालीचे आमदार जिकके ताको, कलाक्तंगचे आमदार दोरजी वांग्दी खर्मा, बोमडिलाचे आमदार डोंगरू सियनग्जू आणि मारियांग-गेकुचे आमदार कांगगोंग टाकू  या सहा आमदारांचा समावेश आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत जदयुचे 7 आमदार निवडून आले होते. याचा जवळपास सर्वच राजकीय पक्षांना आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र, आता जदयूला आता बिहारमध्ये मित्रपक्ष असलेल्या भाजपने दगा दिला आहे. जदयुचे 6 आमदार आपल्याकडे ओढून भाजपनं नितीश कुमार यांना जोर का झटका दिला आहे. हेही वाचा..धारावीकडून मुंबईकरांना 'ख्रिसमस गिफ्ट', 24 तासांत कोरोनाचा एकही रुग्ण नाही 'जदयु'ची आमदारांना नोटीस जदयुच्या बंडखोरी 6 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे, पक्षाध्यक्ष नितीश कुमार यांनी सर्व आमदारांना नोटीस बजावली आहे. आमदार सियनग्जू, खर्मा आणि कांगगोंग टाकू यांना पक्षविरोधी कारवाई करत असल्याचं नितीश कुमार यांच्या आधीच लक्षात आलं होतं, अशीही चर्चा सुरू आहे. दरम्यान, भाजपनं जदयुला झटका दिल्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील भाजपनं जदयुला झटका दिला आहे. यापूर्वी 2019 पासून 2020 या एक वर्षाच्या काळात आधी बिहार आणि आता अरुणाचल प्रदेशात जदयुला धक्के दिले आहेत.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या