जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / चक्क हवेचे मोजावे लागणार पैसे, विद्यापीठाचा थेट फर्मान; काय घेतला असा निर्णय?

चक्क हवेचे मोजावे लागणार पैसे, विद्यापीठाचा थेट फर्मान; काय घेतला असा निर्णय?

खरंतर विद्यापीठाचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने योग्य असल्याचं आढळून आलंय.

खरंतर विद्यापीठाचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने योग्य असल्याचं आढळून आलंय.

विद्यापीठ परिसरात सकाळ-संध्याकाळ शुद्ध हवा मिळवण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडून फी घ्यायची, असा आदेश विद्यापीठ प्रमुखांनी जारी केला आहे. त्यासाठीची रक्कमदेखील ठरवण्यात आली आहे.

  • -MIN READ Local18 Varanasi,Uttar Pradesh
  • Last Updated :

अभिषेक जायसवाल, प्रतिनिधी वाराणसी, 8 जून : उत्तर प्रदेशातील महात्मा गांधी काशी विद्यापीठाने एक अजब फर्मान काढलंय. ज्याची चर्चा अख्ख्या वाराणसीभर होतेय आणि त्याबाबत आश्चर्यही व्यक्त होतोय. खरंतर विद्यापीठाचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने योग्य असल्याचं आढळून आलंय. नेमका काय आहे निर्णय पाहूया. विद्यापीठ परिसरात सकाळ-संध्याकाळ शुद्ध हवा मिळवण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडून फी घ्यायची, असा आदेश विद्यापीठ प्रमुखांनी जारी केला आहे. त्यासाठीची रक्कमदेखील ठरवण्यात आली आहे. सकाळी 5 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत विद्यापीठ परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी हा नियम लागू होईल.

News18लोकमत
News18लोकमत

विद्यापीठ प्रशासनानुसार, विद्यापीठ परिसरात जॉगिंग करणाऱ्यांना प्रति महिना 500 रुपये फी भरावी लागणार आहे. त्याचबरोबर त्यांना 250 रुपये देऊन एक ओळखपत्र बनवून घ्यावं लागेल. तर, 60 वर्षांवरील नागरिकांकडून कोणतीही फी घेण्यात येणार नाही, मात्र त्यांच्यासाठी ओळखपत्र अनिवार्य असेल. त्याशिवाय त्यांना विद्यापीठ परिसरात प्रवेश मिळणार नाही. विद्यापीठ प्रमुखांच्या कार्यालयाशी संपर्क साधून नागरिक हे कार्ड बनवून घेऊ शकतात. त्यासाठी फोटो आणि आधार कार्डची आवश्यकता असेल. Monsoon updates : मान्सून केरळमध्ये दाखल पाहा महाराष्ट्रात कधी येणार? या निर्णयामागचं कारण काय? महात्मा गांधी काशी विद्यापीठ परिसरात चालायला, फिरायला, जॉगिंगला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिसरात एवढी गर्दी होते की एखादी जत्रा भरली आहे, असं वाटतं. याचा हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होतो. त्यांना परिसरात मोकळेपणाने फिरता येत नाही. शिवाय त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होतो. त्यामुळे ही गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता कोणीही मोफत विद्यापीठ परिसरात प्रवेश करू शकणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात