जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / खळबळजनक! मुंबईच्या राजावाडी रुग्णालयातून पॉझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह गायब, किरीट सोमय्यांचा आरोप

खळबळजनक! मुंबईच्या राजावाडी रुग्णालयातून पॉझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह गायब, किरीट सोमय्यांचा आरोप

खळबळजनक! मुंबईच्या राजावाडी रुग्णालयातून पॉझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह गायब, किरीट सोमय्यांचा आरोप

मृतदेहाचे शवविच्छेदन अद्याप बाकी आहे. पण कोरोनाचा रिपोर्ट हाती आला आणि मृतदेह सापडत नसल्याचं किरीट सोमय्या यांनी केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 08 जून : गेल्या काही दिवसांआधी केईएम रुग्णालायतून कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह गायब झाल्याची बातमी समोर आली होती असाच प्रकार पुन्हा एकदा मुंबईच्या रुग्णालयात घडला आहे. एका कोव्हिड-19 रुग्णाचा मृतदेह राजावाडी रुग्णालयातून गायब झाला असल्याचा दावा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. 3 जूनला कोरोनाचा रुग्णाचा मृत्यू झाला. मृतदेहाचे शवविच्छेदन अद्याप बाकी आहे. पण कोरोनाचा रिपोर्ट हाती आला आणि मृतदेह सापडत नसल्याचं किरीट सोमय्या यांनी केला आहे. एक पत्रक जारी करत त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे. सोमय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवनार पोलीस स्टेशन परिसरात 3 जूनला चाकू हल्ल्यामध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण शवविच्छेदनाआधी मृतदेहाची कोरोना चाचणी करावी आणि रिपोर्ट दाखवाव असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. कोरोनाची चाचणी करून मृतदेह शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला. काल मृतदेहाचा कोरोना अहवाल आला आणि तो पॉझिटिव्ह होता. पण त्यानंतर मृतदेह सापडत नसल्याची माहिती समोर आली आहे. सूट मिळताच पुण्यातल्या ‘या’ भागात मोठा फटका, 12 रुग्णांवरून आकडा थेट 372 वर शवविच्छेदन गृहातून मृतदेह गायब झाला असं सोमय्या यांनी पत्रात म्हटलं आहे. मी पोलीस आणि राजावाडी रुग्णालयाशी चर्चा केली असून सत्य समोर यावं असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. असा प्रकार याआधीही केईएम रुग्णालयात घडला आहे. त्यानुसार आता पुढील तपास सुरू आहे. पिंपरीत तुफान राडा, दगडफेक आणि गाड्यांच्या तोडफोडीनंतर पोलिसांकडून लाठीचार्ज केईएममध्ये घडली होती अशीच घटना… केईएम रुग्णालायतून 75 वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण सुधाकर खाडे काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाले होते. त्यांच्या जावयाने रुग्णालयात संपर्क केला असता ते बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणानंतर 15 दिवसांनी सुधाकर खाडे यांचा मृतदेह केईएम रुग्णालयाच्या शवागृहात सापडला होता. या संपूर्ण प्रकरणानंतर केईएम रुग्णालयाच्या प्रशासनावर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मुंबईत धक्कादायक प्रकार, डॉक्टर फिरकले नाहीत म्हणून 16 तास मृतदेह घरात पडून

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात