महालक्ष्मी मंदिरासमोरच तरुणावर सत्तूराने केले 16 वार, भर दिवसा वाहिला रक्ताचा पाठ

महालक्ष्मी मंदिरासमोरच तरुणावर सत्तूराने केले 16 वार, भर दिवसा वाहिला रक्ताचा पाठ

कागलमध्ये भरवस्तीत एकाचा खून करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 24 जुलै : राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरू असल्यामुळे लॉकडाऊन सुरू आहे. असं असलं तरी गुन्ह्यांच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. कोल्हापूरमध्ये हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कागलमध्ये भरवस्तीत एकाचा खून करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भरदिवसा झालेल्या या हत्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय विनायक सोनुले असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. कागलमधल्या महालक्ष्मी मंदिरसमोरच हा खून झाला आहे. दुचाकीवरून येत दोन तरुणांनी हत्या केल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय सोनुलेला आरोपी तरुणांनी शरीरावर सत्तूराने 16 वार केले.

कोरोनात आरोग्याशी असा खेळ! कोल्हापूरच्या अलगीकरण केंद्रातील जेवणात सापडल्या...

शरीरावर खोलवर जखमा झाल्यामुळे अक्षयचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ पोलिसांना प्राचारण केलं. कागल पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी अक्षयचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल केला आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.

लक्षात असूद्या! मुंबईकरांनो, तुमच्या इमारतीमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळला तर...

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपींची अद्याप ओळख पटली नसून पोलीस परिसरातील प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार असून परिसरात असलेले सीसीटीव्हीदेखील तपासले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी मृत अक्षयच्या कुटुंबाला घटनेची माहिती दिली आहे. अक्षयच्या अशा जाण्यामुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबावर आणि मित्रांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: July 24, 2020, 6:31 PM IST

ताज्या बातम्या