मुंबई, 23 जुलै : राज्यात सध्या कोरोना महामारीमुळे हाहाकार माजला आहे. मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. रोज मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची सर्वाधिक वाढ होत आहे. अशात संपूर्ण आरोग्य व्यवस्था पणाला लागली असताना लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे मुंबईत कोरोनाचा आकडा मोठ्या संख्येनं वाढण्यास सुरुवात झाली. उत्तर मुंबईतही कोरोना वेगाने वाढत आहे.
पुढील सगळ्या परिस्थितीचा विचार करत पालिकेने उत्तर मुंबईसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उत्तर मुंबईत रुग्णसंख्या वाढल्याने आता 3 किंवा अधिक रुग्ण सापडले तर पूर्ण इमारत सील केली जाणार आहे. इतकंच काय पण याआधी रुग्ण सापडलेल्या इमारतीत आता 1 जरी रुग्ण सापडला तरी इमारत सील केली जाईल असा नियम पालिकेकडून घेण्यात आला आहे.
दहिसर, बोरीवली कांदिवली आणि मालाड या ठिकाणी अशा इमारती सील केल्या जातील. यासंदर्भात उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी माहिती दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचा (Coronavirus maharashtra updates) उद्रेक सुरूच आहे. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार एकाच दिवसात 9895 कोरोनारुग्णांचं निदान झालं. बुधवारीही दहा हजारांवर नव्या कोरोनारुग्णांचं निदान झालं होतं.
शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारची 5 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम
24 तासांत पाच आकडी नवे रुग्ण सापडण्याचा कालचा पहिलाच दिवस होता. आजही मोठ्या संख्येने रुग्णवाढ झाल्याने राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता 3 लाख 47 502 झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 12,556 वर गेला आहे. दिवसभरात 298 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आता कोरोनाबळींची संख्याही 12854 झाली आहे. राज्यभरात उपचार सुरू असलेले (Active corona patients) तब्बल 1,40,092 रुग्ण आहेत.
एकीकडे Covid रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं, तरी संसर्ग वेगाने पसरतो आहे, हे आजच्या आकडेवारीने स्पष्ट झालं. दिवसभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. 6484 रुग्णांना बरं होऊन घरी सोडण्यात आलं. Unlock नंतर Corona रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली. मुंबईपेक्ष पुण्यात रुग्णवाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. आता सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत.
पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही शहारांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला. पण तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढतेच आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात तीन लाखांवर कोरोना रुग्ण सापडले असले तरी त्यातले 1,94,253 जण बरे होऊन घरी गेले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.