कोरोनात आरोग्याशी असा खेळ! कोल्हापूरच्या अलगीकरण केंद्रातील जेवणात सापडल्या...

कोरोनात आरोग्याशी असा खेळ! कोल्हापूरच्या अलगीकरण केंद्रातील जेवणात सापडल्या...

कोरोनाच्या संसर्गामुळे आरोग्यादायी गोष्टींना अधिक महत्त्व प्रात्प झालं आहे. स्वच्छ जागा, स्वच्छ अन्न आणि शुद्धता ही सध्या महत्त्वाची तत्वे आहेत. पण आरोग्याच्या या परीक्षेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 24 जुलै : राज्यात जीवघेण्या कोरोनामुळे स्वच्छता हा एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे आरोग्यादायी गोष्टींना अधिक महत्त्व प्रात्प झालं आहे. स्वच्छ जागा, स्वच्छ अन्न आणि शुद्धता ही सध्या महत्त्वाची तत्वे आहेत. पण आरोग्याच्या या परीक्षेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरमध्ये अलगीकरण केंद्रातील जेवणात आळ्या आढळल्या आहे. यामुळे रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील तंत्रशिक्षण विभागाच्या वस्तीगृहातील अलगीकरण केंद्रातला हा प्रकार आहे. त्यामुळे अलगिकरण केंद्रातील लोकांनी गोंधळ घातला आहे. कोरोनामुळे लोकांमध्ये आधीच भीतीचं वातावरण आहे त्यात पुन्हा एकदा असा प्रकार घडल्यामुळे अलगीकरण केंद्रात दिला जाणाऱ्या सोयीसुविधावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

लक्षात असूद्या! मुंबईकरांनो, तुमच्या इमारतीमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळला तर...

संबंधित घटना घडल्यानंतर केंद्रातील रुग्णांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिलांना प्राचारण करण्यात आलं. अलगीकरण केंद्रातील लोक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचीही माहिती समोर येत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये अशा अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

महत्त्वाची बातमी, कारमध्ये टायर ठेवण्याबद्दल नियमात बदल

खरंतर, कोरोनाच्या या महाभयंकर संकटामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्था कामाला लागली आहे. आपल्या जीवाची परवा न करता आरोग्य विभागातील कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर स्वच्छतेचाही मोठा भार आहे. अशात अशा घटना धोक्याच्या आहेत.

Published by: Renuka Dhaybar
First published: July 24, 2020, 5:15 PM IST

ताज्या बातम्या